आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूंची घोडेवाडी शाळेस भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 12:11 AM2017-09-01T00:11:55+5:302017-09-01T00:12:26+5:30

दिंडोरी तालुक्यातील घोडेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर, प्रतिकुलगुरु डॉ. मोहन खामगावकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते सुनील देशपांडे, सहाय्यक कुलसचिव डॉ. राजीव आहेर, जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल तोरणे, कक्ष अधिकारी संदीप राठोड, बाळासाहेब पेंढारकर, सामाजिक कार्यकर्ते अजय कुलकर्णी यांनी भेट दिली.

Visiting the Vice Chancellor School of Health Sciences University | आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूंची घोडेवाडी शाळेस भेट

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूंची घोडेवाडी शाळेस भेट

Next

वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील घोडेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर, प्रतिकुलगुरु डॉ. मोहन खामगावकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते सुनील देशपांडे, सहाय्यक कुलसचिव डॉ. राजीव आहेर, जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल तोरणे, कक्ष अधिकारी संदीप राठोड, बाळासाहेब पेंढारकर, सामाजिक कार्यकर्ते अजय कुलकर्णी यांनी भेट दिली.
शालेय आवारात विद्यार्थ्यांनी व पालकांनी अवयवदान विषयावर काढलेल्या रांगोळ्या बघून तसेच शाळेच्या प्रगतीबद्दल विशेष कौतुक केले. उपशिक्षक विलास जमदाडे यांनी शाळेच्या नावीन्यपूर्ण उपक्रामविषयी तसेच शाळेने लक्षणीय शाळा सुधार जमा करून केलेल्या भौतिक सोयीसुविधांबाबत माहिती दिली. याप्रसंगी आंबेवणीचे सरपंच अशोक वडजे, उपसरपंच माधव गायकवाड, माजी सरपंच शोभाताई मातेरे, सदस्य रामदास मातेरे, दीपक जाधव, अर्जुन घोडे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पंढरीनाथ बगाड, शाळेचे मुख्याध्यापक प्रल्हाद सोनवणे आदींसह घोडेवाडी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Visiting the Vice Chancellor School of Health Sciences University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.