अतिथींच्या मुखातून सहज येतात ‘वाह...नाशिक’ असे गौरवोद्गार !
By azhar.sheikh | Published: February 27, 2018 02:47 PM2018-02-27T14:47:04+5:302018-02-27T14:47:04+5:30
उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेत घाणीचे साम्राज्य किंवा अतिक्रमण वाढीस लागू नये आणि शहराच्या सौंदर्यीकरणाला डाग लागू नये, यासाठी सुशोभीकरण करण्यात आले. हिरवळीचे कोंदण या जागेला लाभले आहेत.
नाशिक : नाशिक हे धार्मिक व निसर्ग पर्यटनाचे मुख्य केंद्र. कुंभनगरी ते देशाची ‘वाईन कॅपिटल’ अशी काळानुरूप ओळख निर्माण केलेल्या या शहराच्या विकासामध्ये भर पडली ती मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपूलामुळे. उड्डाणपूल म्हणजे जणू नाशिकचा ‘नेकलेस’च. उड्डाणपूलाच्या वैभवामध्ये भर पडली ती म्हणजे उड्डाणपुलाखाली जागेवरील सौंदर्यीकरण व सुशोभीकरणामुळे.
उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेत घाणीचे साम्राज्य किंवा अतिक्रमण वाढीस लागू नये आणि शहराच्या सौंदर्यीकरणाला डाग लागू नये, यासाठी सुशोभीकरण करण्यात आले. हिरवळीचे कोंदण या जागेला लाभले आहेत. यामुळे उड्डाणपूलाच्या सौंदर्यात अधिकच भर पडली अहे. केवळ सुशोभीरकणच नव्हे तर तात्यासाहेब अर्थात कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज आणि चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचे जन्मगाव म्हणून त्यांचे आकर्षक रेखाटलेल्या छायाचित्रांपासून तर रक्तदान, वृक्षदान, नेत्रदानासह बेटी बचाओ,बेटी पढाओ असा समाजप्रबोधनाचा दिलेला संदेश महामार्गावरुन शहरात येणा-या पाहुण्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. तसेच लाभलेले हिरवाईचे कोंदण आणि भिंतींसह खांबांवरील चित्राकृती बघून पाहुण्यांच्या मुखातून ‘वाह...नाशिक’ असे गौरवोद्गार सहज बाहेर पडतात.
उड्डाणपूलाच्या सौंदर्य अधिकच खुलून दिसत असून लक्ष वेधून घेत आहे. विविधप्रकारची शोभीवंत फुलझाडे येथे लावण्यात आली आहे. तसेच उड्डाणपूलाच्या खांबांवर धावपटू कविता राऊतसह विविध चित्राकृती रेखाटण्यात आल्या आहेत.
नाशिकच्या उड्डाणपूलाखाली करण्यात आलेल्या सौंदर्यीकरण अन्य शहरांमधील उड्डाणपूलासाठी देखील आदर्श ठरणारे आहे.