स्मारकाला दिल्या जाणाऱ्या भेटी दलित व्होट बॅँकेसाठीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 11:51 PM2020-01-22T23:51:30+5:302020-01-23T00:27:41+5:30
इंदू मिल येथील आंबेडकर स्मारकाला दिल्या जाणाºया भेटी या दलित व्होट बॅँकेसाठी असल्याचा आरोप करीत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केला. मुंबईतील नाइट लाइफमुळे गुन्हेगारीत वाढ होण्याचा धोका अधिक आहे. गुन्हेगारी टोळ्यांचे यामुळे फावणार असून, शिवाय महिलांची सुरक्षितता धोक्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
नाशिक : इंदू मिल येथील आंबेडकर स्मारकाला दिल्या जाणाºया भेटी या दलित व्होट बॅँकेसाठी असल्याचा आरोप करीत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केला. मुंबईतील नाइट लाइफमुळे गुन्हेगारीत वाढ होण्याचा धोका अधिक आहे. गुन्हेगारी टोळ्यांचे यामुळे फावणार असून, शिवाय महिलांची सुरक्षितता धोक्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
परिषदेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज्य सरकारच्या धोरणांवर टीकाही केली. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शरद पवार यांनी मुंबईतील इंदू मिल येथील आंबेडकर स्मारकाची पाहणी केली. त्यावर आठवले यांनी दलित व्होट बॅँकेच्या दृष्टीने स्मारकाची पाहणी अनेक जण करत असल्याची टीका केली. जोपर्यंत आपण पंतप्रधान मोदींसोबत आहे, तोपर्यंत आमची मते पवारांना मिळणार नाही, असा चिमटादेखील त्यांनी काढला. साडेबारा एकरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मारकाचे भूमिपजून झाले होते. चबुतºयासह साडेतीनशे फुटांचा पुतळा त्या ठिकाणी उभारला जाणार आहे. भूमिगत काम सुरू असल्याने ते काम दिसून येत नाही. मी लवकरच स्मारकाला भेट देणार आहे. स्मारकाचा निधी वाडिया हॉस्पिटलला देणे मला मान्य नाही, असे सांगत प्रकाश आंबेडकरांची भूमिका मान्य नसल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले. राज्य सरकारने गरिबांसाठी असलेल्या वाडिया हॉस्पिटलला स्वतंत्र निधी द्यावा, अशी सूचना त्यांनी केली.
नाइटलाइफविषयी त्यांनी रात्री सर्व आस्थापना सुरू ठेवणे हे कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने अडचणीचे ठरणार असल्याचे सांगितले. मातोरी येथील फार्महाउस येथे काही दिवसांपूर्वी दोन युवकांवर झालेल्या अत्याचार व गैरकृत्याबाबत विचारले असता पोलीस गुन्हेगारांवर कारवाई करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नागरिकत्व कायदा हा कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. कायदा समजून घेण्याची गरज आहे. विरोधकांना पाच वर्षे मोदींच्या विरोधात बोलण्यासाठी मुद्दा नव्हता. आता विरोधक हा मुद्दा पुढे करत आहेत. या कायद्याबाबत सूचना असल्यास त्या पाठवाव्यात असे आठवलेंनी स्पष्ट केले.