दृष्टिबाधिताने कळसूबाई शिखर केले २१ वेळा सर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 01:45 AM2019-08-12T01:45:53+5:302019-08-12T01:55:23+5:30
१२५ दिवसांत तब्बल २१ वेळा कळसूबाई शिखर सर करून जागतिक विक्रम करणाऱ्या दृष्टिबाधित सागर बोडके याच्या कामगिरीने विक्रमाची नोंद केलेली आहे. पट्टीच्या गिर्यारोहकांनाही चकीत करणाºया या कामगिरीनंतर आता सागर एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न पाहत आहे.
नाशिक : १२५ दिवसांत तब्बल २१ वेळा कळसूबाई शिखर सर करून जागतिक विक्रम करणाऱ्या दृष्टिबाधित सागर बोडके याच्या कामगिरीने विक्रमाची नोंद केलेली आहे. पट्टीच्या गिर्यारोहकांनाही चकीत करणाºया या कामगिरीनंतर आता सागर एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न पाहत आहे.
गरुडझेप प्रतिष्ठानतर्फे रविवारी (दि.११) कालिका मंदिर सभागृहात जागतिक विक्र म प्रमाणपत्र वितरण करून सागरचे कौतुक करण्यात आले. व्यासपीठावर गरु डझेप प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संदीप भानोसे, एव्हरेस्ट वीर डॉ. महेंद्र महाजन, जिल्हा क्र ीडाअधिकारी रवींद्र नाईक, वंडर बुक आॅफ लंडनच्या प्रतिनिधी अमी छेडा होते. यावेळी सागर बोडकेला विश्वविक्र म प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
दिव्यांगावर मात करून हे धाडस करणारा सागरने समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. भविष्यात युवा वर्गाने यातून प्रेरणा घ्यावी, असे प्रतिपादन एव्हरेस्ट वीर डॉ. महेंद्र महाजन यांनी केले. गरुडझेप प्रतिष्ठानतर्फे जागतिक विक्रम प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सागरने त्याच्या या धाडसी मोहिमेविषयीचे अनुभव कथन केले. भविष्यात त्याने एव्हरेस्ट सर करण्याची इच्छाही प्रगट केली़
यावेळी कार्यक्रमात गरुडझेपच्या संकेत भानोसे, मानवधन संस्थेचे अध्यक्ष प्रकाश कोल्हे, उल्हास कुलकर्णी, नितीन देवरे, डॉ. संतोष वैद्य, संजय पवार, मंगेश तारगे, आनंद बोरा, दिलीप गिते, सक्षमचे विसपुते व देशमुख, सुभाष फड, प्रशांत परदेशी, रमेश बडदादे, सुहास न्यायधीश, तुकाराम खांडगे, राजेंद्र पवार, अंकुर यादव, गुलाब आहेर, अंबरीश गुरव, राजेंद्र पवार, बाळू पोरजे, रमेश सोमवंशी, चंद्रकांत नाईक यांचा स्मृतिचिन्ह व गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. रवी नाईक यांनी सागरला सहाय्यता करण्याचे आश्वासन दिले. आभार प्रदर्शन डॉ. संदीप भानोसे यांनी केले.सूत्रसंचालन रतन भावसार यांनी केले.