विठेवाडीच्या शेतकऱ्याने वांगी फेकली गिरणाकाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:18 AM2021-08-26T04:18:11+5:302021-08-26T04:18:11+5:30
विठेवाडी येथील तरुण शेतकरी राजेंद्र धनाजी देवरे यांनी दोन एकर क्षेत्रात देशी रैवया जातीच्या काळ्या वाणाच्या वांगीची लागवड केली ...
विठेवाडी येथील तरुण शेतकरी राजेंद्र धनाजी देवरे यांनी दोन एकर क्षेत्रात देशी रैवया जातीच्या काळ्या वाणाच्या वांगीची लागवड केली होती. त्यासाठी त्यांनी दोन एकर क्षेत्राकरिता ठिबक सिंचन, पाइप, मल्चिंग पेपर, यासाठी ४८,००० रुपये तर दोन ट्रक शेणखत, रोपं, मशागत यासाठी ५०,००० रुपये खर्च करून लागवड केली. तीन महिन्यांत त्यांनी त्यावर दीड लाखांपर्यंत खर्च केला. सुरुवातीला पहिल्या एक-दोन तोडणीला सुरत मार्केटला ४०० ते ४५० रुपये प्रति जाळी दर मिळाला. परंतु एक आठवडा उलटल्यावर मोठ्या प्रमाणात वांगी निघाली. संपूर्ण ट्रकभर वांगी तोडून सुरत मार्केटला पाठवले, तेव्हा काही जाळ्या १६० प्रति जाळीप्रमाणे विक्री झाल्या. बाकीचे वांगी कमी भावात घेतल्याने फेकून द्यावी लागली. मागील आठवड्यात त्यांनी एक ट्रॅक्टर वांगी तोंडून गिरणा नदी काठावर फेकून दिली.
कोट...
शेतकरी शहरातील जनतेला ताजा भाजीपाला तयार करून पाठवतो. मात्र बाजारात माल दाखल झाल्यानंतर व्यापारी कवडीमोल भाव देऊन त्याची लूट करतो. यावर कोणाचेच नियंत्रण नसते. ‘खर्चा रुपया, मिला चार अना’ अशी गत शेतकऱ्यांची झाली आहे. टोमॅटोला बाजारात कमी भाव मिळत नसल्याने विठेवाडी, भउर शिवारात टोमॅटो असा रस्त्यावर फेकण्यात आला आहे.
- कुबेर जाधव, समन्वयक, स्वाभिमानी शेतकरी संघटना