विठोबा महाराज यात्रोत्सवाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 10:23 PM2020-02-05T22:23:48+5:302020-02-06T00:48:34+5:30
श्री विठोबा महाराज यात्रा महोत्सवाला श्री विठ्ठल रुखमाईच्या महापूजेने व श्री विठोबा महाराज रथ मिरवणुकीने बुधवारपासून प्रारंभ झाला. जया एकादशीच्या मुहूर्तावर गांधी चौकातील विठ्ठल मंदिरात पहाटे सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष राजेंद्र मैंद यांनी सहकुटुंब महापूजा केली विठ्ठल रु ख्मिणी रथाची पूजा महोत्सव समितीचे अध्यक्ष नितीन पगार, नगराध्यक्ष रोहिणी महाले यांनी सपत्निक केल्यानंतर रथ मिरवणुकीला प्रारंभ झाला.
कळवण : ग्रामदैवत श्री विठोबा महाराज यात्रा महोत्सवाला श्री विठ्ठल रुखमाईच्या महापूजेने व श्री विठोबा महाराज रथ मिरवणुकीने बुधवारपासून प्रारंभ झाला. जया एकादशीच्या मुहूर्तावर गांधी चौकातील विठ्ठल मंदिरात पहाटे सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष राजेंद्र मैंद यांनी सहकुटुंब महापूजा केली विठ्ठल रु ख्मिणी रथाची पूजा महोत्सव समितीचे अध्यक्ष नितीन पगार, नगराध्यक्ष रोहिणी महाले यांनी सपत्निक केल्यानंतर रथ मिरवणुकीला प्रारंभ झाला.
उपनगराध्यक्ष अतुल पगार, गटनेते कौतिक पगार, नगरसेवक सुधाकर पगार, माजी सरपंच भावराव पगार, परशुराम पगार, भूषण पगार, सुनील शिरोरे, राजाराम पगार, कृष्णा पगार, हरीश्चंद पगार, राजेंद्र पगार, रविंद्र पगार, संजय मालपुरे, मोतीराम पगार, निंबा पगार, जितेंद्र पगार, शंकर निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत महोत्सवाला प्रारंभ झाला. मिरवणुकीत लेजीम पथक, टिपरी नृत्य आणि ढोलताशा, बँड पथकाने भक्तांचे लक्ष वेधून घेतले. सात तास चाललेल्या मिरवणुकीचे ठिकठिकाणी कळवणकर नागरिक, गणेश मंडळे, मित्रमंडळांनी फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत केले. महिलांनी ठिकठिकाणी रांगोळी काढून स्वागत करीत श्री विठ्ठलाची पूजा केली.
कीर्तन, तमाशाचे आयोजन
श्री विठोबा महाराज यात्रा महोत्सवनिमित्त दरवर्षीप्रमाणे विविध धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरु वारी ६ फेब्रुवारी रोजी सकाळी९ ते ११ वाजेदरम्यान हभप संजय धोंडगे यांच्या काल्याचे कीर्तन होणार आहे. दुपारी १२ ते ३ दरम्यान गांधी चौकात रामदास देवमन पगार व रवींद्र रामदास पगार यांच्याकडून महाप्रसाद कार्यक्र म आयोजित केला आहे. रात्री ९ वाजता लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.७ व ८ फेब्रुवारीला कै. राजाराम लक्ष्मण पगार कुस्ती मैदानावर कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली असल्याची माहिती यात्रा महोत्सव समितीचे अध्यक्ष नितीन पगार यांनी यावेळी दिली.