विठूनामाच्या गजराने दुमदुमले कळवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:11 AM2021-07-21T04:11:58+5:302021-07-21T04:11:58+5:30
दिवसभरात ५० हजार भक्तांनी घेतले दर्शन कळवण : आषाढी एकादशीचा सण शहर व तालुक्यात विविध उपक्रम व धार्मिक कार्यक्रमांचे ...
दिवसभरात ५० हजार भक्तांनी घेतले दर्शन
कळवण : आषाढी एकादशीचा सण शहर व तालुक्यात विविध उपक्रम व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून उत्साहात साजरा करण्यात आला. गांधी चौक (पंचवटी) येथील प्रतिपंढरपूर गणल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिरात हजारो विठ्ठल भक्त भाविकांनी दर्शन घेतले.
श्री विठोबा महाराज मंदिरात पहाटे उद्योजक मधुकर खैरनार, लक्ष्मण खैरनार यांनी सपत्नीक महापूजा केली. विठेवाडी पाळे, नरुळ, मेहदर, ओतूर, सुकापूर, रवळजी, भेंडी, गोपाळखडी आदी तालुक्यातील व परिसरातून विठ्ठल, रुक्मिणीच्या भाविकांच्या दिंड्या मंदिर परिसरात दाखल झाल्या होत्या. ट्रस्टचे उपाध्यक्ष सुधाकर पगार, सरचिटणीस जयंत देवघरे, विश्वस्त परशुराम पगार, कौतिक पगार, शिक्षक नेते कारभारी पगार, संजय मालपुरे, कृष्णा पगार, के. के. शिंदे, हरिभाऊ पगार, मोतीराम पगार, राजेंद्र पगार, डॉ. पी. एच. कोठावदे, सुनील कोठावदे, भावराव पगार, शंकर निकम, रवींद्र पगार, भाऊसाहेब पगार आदींनी दिंडीतील विठ्ठल भक्तांचे व विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे स्वागत केले. एकादशी निमित्ताने पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत जिल्ह्याच्या विविध भागातून ५० हजारांहून अधिक विठ्ठल भक्त विठूरायापुढे नतमस्तक झाले.
फोटो - कळवण येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी केलेली गर्दी.