विठोबा महाराज यात्रोत्सवास प्रारंभ
By admin | Published: February 8, 2017 10:47 PM2017-02-08T22:47:43+5:302017-02-08T22:47:57+5:30
कळवण : विठ्ठल-रु क्मिणी रथाची मिरवणूक, आजपासून कुस्त्यांंची दंगल
कळवण : शहराचे ग्रामदैवत श्री विठोबा महाराज यात्रोत्सवास मंगळवारी विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींच्या महापूजेने व विठोबा महाराज रथ मिरवणुकीने उत्साहात प्रारंभ झाला. जया एकादशीच्या मुहूर्तावर विठ्ठल मंदिरात पहाटे तहसीलदार कैलास चावडे, यात्रा महोत्सव समितीचे अध्यक्ष संदीप पगार, उपाध्यक्ष नितीन पगार यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. कळवण नगरपंचायतचे गटनेते कौतिक पगार, नगराध्यक्ष सुनीता पगार यांच्या हस्ते सकाळी ६ वाजता रथ मिरवणुकीला गांधी चौकातून प्रारंभ झाला.
९८ वर्षांची धार्मिक परंपरा असलेल्या या यात्रोत्सवानिमित्त दि. ९ व १० रोजी राजाराम पगार मैदानावर कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले आहे. रथ मिरवणुकीला उपनगराध्यक्ष अनिता जैन, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुनील शिरोरे, भाजपा तालुकाध्यक्ष सुधाकर पगार, भाजपा नेते अशोक जाधव, माजी सरपंच भावराव पगार, ज्येष्ठ विधिज्ञ परशुराम पगार, हरिश्चंद पगार, राहुल पगार, रवींद्र पगार, साहेबराव पगार, मोतीराम पगार, जितेंद्र पगार आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
मिरवणुकीत विठोबा महाराज यात्रा समितीचे पदाधिकारी, सुरेश पगा, सुधाकर पगार, कृष्णा पगार, अशोक जाधव, नगरसेवक जयेश पगार, अतुल पगार, गौरव पगार, टिनू पगार, चेतन पगार, सुरेश पगार, स्वप्नील पगार, अमोल पगार, मनीष पगार, शंकर निकम, नंदिकशोर पगार, मिलिंद पगार, सचिन पगार, किरण पगार, समीर पगार यांच्यासह गांधी चौक मित्रमंडळ, महाराजा मित्रमंडळ, गणेशनगर मित्रमंडळ, मृत्युंजय मित्रमंडळ, शिवाजीनगर मित्रमंडळ, जय बाबाजी भक्तपरिवार मित्रमंडळ यांच्यासह विविध मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यानिमित्त श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले होते. संजय महाराज पाचपोर यांनी वाचन केले. बुधवारी (दि. ८) संजय धोंडगे यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली. (वार्ताहर)