विठ्ठलवाडी शाळा परिसर झाला जलमय
By admin | Published: September 19, 2015 11:17 PM2015-09-19T23:17:49+5:302015-09-19T23:18:22+5:30
विठ्ठलवाडी शाळा परिसर झाला जलमय
विंचूर : येथून जवळच असलेल्या विठ्ठलवाडी येथील जि. प. शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ काल झालेल्या पावसाचे पाणी तुंबल्याने अनेक विद्याथ्यांना शनिवारी शाळेत जाता आले नाही. शाळेवजळच राहणा-या शेतक-याने रस्त्यानजीकची गटारनाली बुजविल्याने विद्याथ्यांसह ग्रामस्थांचे हाल होत असून, याबाबत तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
येथून तीन कि.मी अंतरावर असलेल्या विठ्ठलवाडी येथील जि.प. शाळेत सुमारे ६० च्यावर मुले शिक्षण घेत असून, शेजारी अंगणवाडीचेही वर्ग भरविले जातात. विठ्ठलवाडीसह परिसरात शुक्र वारी झालेल्या मुसळधार पावसामुळे रसत्यांवरु न पाणी वाहत होते. मात्र, येथील शाळेजवळून जाणारी रस्त्याजवळील गटार नाली जवळच राहणा-या इसमाने बुजवून टाकल्याने शाळेजवळ तुड़ूंब पाणी साचले. शुक्रवारी शाळा सुटल्यांनंतर शिक्षकांच्या व ग्रामस्थांच्या मदतीने विद्याथ्यांना शाळेबाहेर पडता आले. आज दुस-या दिवशीही तीच परिस्थिती असल्याने शनिवारी सकाळी मुले शाळेत आली असता तुडुंब भरलेल्या पाण्यातून शाळेत न जाता अनेक विद्यार्थी व पालकांनी घरचा रस्ता धरला. आज सकाळी सरपंच सौ. शकुंतला दरेकर, ग्रामविकास अधिकारी जी. टी. खैरनार, तलाठी कार्यालयातील कर्मचा-यांसह पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. गेल्या तीन मिहन्यांपूर्वीही शाळेत अशीच परिस्थिती उद्भवली होती. त्यावेळी संबंधित इसमाने तत्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले मात्र त्यावर कुठलीही कार्यवाही न झाल्याने आज झालेल्यÞा पावसात पुन्हा विद्याथ्यांचे हाल झाले.
प्रवेशद्वाराजवळच पाणी साचलेले असल्याने प्रवेशद्वारासह शाळेच्या इमारतीला धोका निर्माण झाला असून याबाबत तत्काळ कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांसह शाळा व्यवस्थापन समतिीने केली आहे. (वार्ताहर)