विठू माउली संगे कपिकुलात उद्या रंगणार प्रगटदिन सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 11:54 PM2019-02-23T23:54:53+5:302019-02-23T23:55:21+5:30
श्री कपिकुल सिद्धपीठम नाशिक येथे दरवर्षीप्रमाणे श्री श्री मुख्यदेव श्री गजानन महाराज यांच्या प्रगट दिनोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १००८ श्री महंत तपोमूर्ती सद््गुरू श्री वेणाभारती महाराज यांच्या आशीर्वादाने व उत्तराधिकारी कार्याध्यक्ष कृष्णमै यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम येत्या २५ रोजी संपन्न होणार आहे.
पंचवटी: श्री कपिकुल सिद्धपीठम नाशिक येथे दरवर्षीप्रमाणे श्री श्री मुख्यदेव श्री गजानन महाराज यांच्या प्रगट दिनोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १००८ श्री महंत तपोमूर्ती सद््गुरू श्री वेणाभारती महाराज यांच्या आशीर्वादाने व उत्तराधिकारी कार्याध्यक्ष कृष्णमै यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम येत्या २५ रोजी संपन्न होणार आहे.
यंदाच्या वर्षीच्या उत्सवाचे खास आकर्षण म्हणजे श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे उद््घाटन व संपादिका सद््गुरु वेणाभारती महाराज लिखित कपिकुल या त्रैमासिकाचे प्रकाशन विठू माउली फेम अभिनेता अजिंक्य राऊत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
कपिकुल आश्रम पंचवटी येथून पालखी प्रस्थान होऊन गोदाघाट येथे दि. २५ रोजी सकाळी ९ वाजता कार्यक्र म संपन्न होणार आहे. पुरोहित संघातर्फे श्रींच्या पादुकांचे गोदघाट येथे पूजन करण्यात येणार आहे.
आध्यात्मिक, मानसिक उन्नतीसाठी प्रकाशित होणाऱ्या मासिकात श्री गुरूंची भारतभर १९ वर्षांत झालेली हजारो प्रवचने व त्यामधील आध्यात्मिक ज्ञान मेजवानी वाचकांस मिळणार आहे. हा उत्सव पंचवटीतील श्रीकपालेश्वर मंदिराजवळील श्री गजानन महाराज मंदिर श्री कपिकुल सिद्धपीठम येथे होईल.
उत्सवादरम्यान दिवसभर महाप्रसाद, लहान मुलांचे श्री गजानन विजयग्रंथ पारायण आणि भजनी मंडळ कार्यक्र म होणार आहे. दि. २७ रोजी कपिकूल येथे दरवर्षीप्रमाणे सकाळी ११ वाजता श्री दासनवमी उत्सवानिमित्त श्रीगुरूंचे श्री दासबोधामधील सत्वगुण विषयावर प्रवचन होईल व त्यानंतर श्रीगुरूंहस्ते भाग्यदायी अशी संन्यासी झोळीतील अमूल्य भिक्षा सर्वांना दिवसभर वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कपिकुल उत्तराधिकारी कृष्णमयी यांनी केले आहे.
पाथर्डी फाटा परिसरातही कार्यक्रम
गजानन महाराज बहुद्देशीय संस्थेच्या वतीने पाथर्डी फाटा परिसरातील गजानन महाराज मंदिरात प्रगट दिन सोहळ्याचा कार्यक्रम सोमवारी होणार आहे. सकाळी ८ वाजता पाथर्डी फाटा परिसरात पालखी सोहळा आयोजित करण्यात आला असून, दुपारी १२.३0 वाजता मंदिरात महाआरती होणार आहे. सायंकाळी ४ वाजता पाथर्डी फाटा येथे मुक्ताई भजनी मंडळातर्फे भजनाचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ५.३0 ते रात्री ९ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.