व्ही.जे. हायस्कूलमध्ये गणपती तयार करण्याची आॅनलाइन कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 09:44 PM2020-08-19T21:44:52+5:302020-08-20T00:16:09+5:30
नांदगाव : येथील व्ही.जे. हायस्कूलमध्ये शाडूमातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा आॅनलाइन पद्धतीने पार पडली. विद्यालयात गेल्या १२ वर्षांपासून शाडूमातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जात आहे.
नांदगाव : येथील व्ही.जे. हायस्कूलमध्ये शाडूमातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा आॅनलाइन पद्धतीने पार पडली. विद्यालयात गेल्या १२ वर्षांपासून शाडूमातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जात आहे.
यावर्षी कोविड-१९ या महामारीमुळे शाळा बंद असल्याने या कार्यशाळेत खंड पडू नये व विद्यार्थ्यांना घरच्या घरी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करता यावा यासाठी आॅनलाइन पद्धतीने कार्यशाळा घेण्यात आली. कलाशिक्षक विजय चव्हाण यांनी शाडूमाती भिजवण्यापासून ते रंगकामापर्यंत पाच पाच मिनिटांचे असे पाच व्हिडिओ तयार करून वर्गाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर करून विद्यार्थ्यांना घरीच गणपती तयार करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी उपक्रमाला चांगला प्रतिसाद देऊन १६० गणेशमूर्र्ती तयार केल्या. ज्या विद्यार्थ्यांना अडचणी आल्या त्यांनी कलाशिक्षकांशी फोनद्वारे संपर्क केला. सध्याच्या परिस्थितीत गर्दी टाळण्यासाठी सण-उत्सव साजरा करण्याचे मोठे आव्हान आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गणेशमूर्तींची घरी स्थापना करावी तसेच विसर्जनही घरीच करावे, असे आवाहन प्रतिमा खैरनार, संजीव धामणे, भैयासाहेब चव्हाण, भास्कर मधे यांनी विद्यार्थ्यांसह पालकांना केले. कलाशिक्षक विजय चव्हाण, चंद्रकांत दाभाडे, सुरेश गावीत यांनी मार्गदर्शन केले.