महानिर्मिती कंपनी अंतर्गत व्हॉलीबॉल स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 04:59 PM2019-02-13T16:59:02+5:302019-02-13T16:59:05+5:30
एकलहरे : महानिर्मिती कंपनीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांनी दिलेल्या मंजुरीनुसार ४३ व्या अखिल भारतीय विद्युत क्र ीडा नियंत्रण मंडळाच्या व्हॉलीबॉल स्पर्धेच्या आयोजनाचे यजमानपद महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीस प्राप्त झाले आहे. त्यानुसार नाशिक औष्णिक विद्युत केंद्र एकलहरे येथे दि. २० ते २२ फेब्रुवारीदरम्यान या स्पर्धा खेळविल्या जाणार आहेत.

अखिल भारतीत पातळीवरील स्पर्धा असल्याने आयोजन व नियोजन सुव्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी एकलहरे वीज केंद्राचे मुख्य अभियंता उमाकांत निखारे यांच्या अध्यक्षतेखाली व कार्यकारी संचालक मानव संसाधन यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीचे आयोजन करून स्थानिक पातळीवर क्र ीडा आयोजन समितीची स्थापना करण्यात आली आहे.
समितीच्या अध्यक्षपदी मुख्य अभियंता उमाकांत निखारे यांची निवड करण्यात आली आहे.
कार्यकारिणी पुढीलप्रमाणे कार्याध्यक्ष नवनाथ शिंदे व आनंद भिंताडे उपाध्यक्ष सुनील इंगळे व देवेंद्र माशाळकर ,
मुख्य समन्वयक अनिल मुसळे ,
समन्वयक पुरु षोत्तम वारजूरकर ,
स्थानिक समन्वयक राकेश कमटमकर,
सचिव निवृत्ती कोंडावले,
खजिनदार संदीप कापसे,
कार्यकारी समन्वयक शशांक चव्हाण, मनोहर तायडे, राजेंद्र कुमावत, बाबासाहेब पाटील, सूर्यकांत वाघमारे (सर्व अधीक्षक अभियंते), सम्ीार देऊळकर
यासह विविध समित्यांचीही स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये स्वागत, क्र ीडा स्पर्धा आयोजन, मैदान व निवासव्यवस्था, उच्चतंत्र, सजावट, वाहतूक, भोजन, उद्घाटन व बक्षीस वितरण, तक्र ार निवारण, प्रेस व प्रसिद्धी, मनोरंजन व सांस्कृतिक कार्यक्र म, प्रथमोपचार, सुरक्षा, सूत्रसंचालन, विद्युतव्यवस्था आदी समित्यांची स्थापना करून जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
भारतभरातून खेळाडू एकलहरेत येत असल्याने एकलहरे वसाहत व वीज केंद्र परिसरात रस्ते दुरु स्ती, इमारतींची साफसफाई व मैदान तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.