जपानहून परतलेल्याचे स्वेच्छेने होम क्वॉरण्टाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 11:56 PM2020-03-27T23:56:08+5:302020-03-27T23:56:29+5:30

होम क्वॉरण्टाइनचा सल्ला दिलेला असताना पळून जाणाऱ्या कोरोना संशयितांच्या बातम्या दररोज प्रसिद्ध होत असल्या व पळून जाणाऱ्यांचे उद्देश वेगवेगळे असले तरी जपानमध्ये दोन महिने राहून परतलेल्या नांदगावच्या एका व्यक्तीने गेले तीन आठवडे स्वेच्छेने स्वत:ला होम क्वॉरण्टाइन करून घेतल्याचे सामाजिक बांधिलकी जपणाºया जाणिवांचे एक चांगले उदाहरण समोर आले आहे.

Volunteer Home Quarantine from Japan | जपानहून परतलेल्याचे स्वेच्छेने होम क्वॉरण्टाइन

जपानहून परतलेल्याचे स्वेच्छेने होम क्वॉरण्टाइन

googlenewsNext
ठळक मुद्देनांदगाव : कोरोनाला पराभूत करणारी आचरली जीवनशैली


नांदगाव : होम क्वॉरण्टाइनचा सल्ला दिलेला असताना पळून जाणाऱ्या कोरोना संशयितांच्या बातम्या दररोज प्रसिद्ध होत असल्या व पळून जाणाऱ्यांचे उद्देश वेगवेगळे असले तरी जपानमध्ये दोन महिने राहून परतलेल्या नांदगावच्या एका व्यक्तीने गेले तीन आठवडे स्वेच्छेने स्वत:ला होम क्वॉरण्टाइन करून घेतल्याचे सामाजिक बांधिलकी जपणाºया जाणिवांचे एक चांगले उदाहरण समोर आले आहे.
जपानहून विमानाने पुणे येथे उतरल्यानंतर आरोग्य विभागाच्या सल्ल्यानुसार १४ दिवस पुणे येथे होम क्वॉरण्टाइनचे नियम पाळून स्वत:ला समाजापासून विलग करून कोरोना नसल्याचा निर्वाळा मिळाल्यावर ही व्यक्ती नांदगाव येथे आली. त्यानंतर ती स्वयंप्रेरणेने स्वत:वर लादलेल्या होम क्वॉरण्टाइनमध्येच आहे. आपला मुलगा घरी येत असल्याचे कळाल्यावर, वडिलांनी त्याच्यासाठी स्वतंत्र खोलीची व्यवस्था केली. खोली व त्याचे सामान पूर्ण निर्जंतुक केले. अगदी जेवायला देताना व इतर बाबीत त्याच्यापासून चार ते पाच फुटांचे अंतर ठेवूनच सर्व दैनंदिन व्यवहार सुरू ठेवले. युवक, त्याचे आई वडील व बहीण असे चार जण घरी राहतात. एवढी काळजी घेऊन कोरोनाशी सामना झालाच तर घरातल्या चौघांशिवाय पाचव्या व्यक्तीला त्याचा संसर्ग होऊ नये अशी खबरदारी घेत जवळचे नातेवाईक असोत, की कामावर येणारे त्या सर्वांना सुट्ट्या देण्यात आल्या.
नांदगाव येथे येण्यापूर्वी ‘तो’ जपानमध्ये असताना तिथे मास्कचा तुटवडा झाला. मास्क मिळेना म्हणून त्याच्या कंपनीने मुंबईहून सिंगापूरपर्यंत आपला माणूस पाठवला आणि तिथून मास्क दुसºया विमानाने जपानला पाठवला. आंतरराष्ट्रीय कंपनी आपल्या माणसाला किती महत्त्व देते या अनुभवाबरोबरच जपानी लोकांमधली जागरूकता त्याने अनुभवली. या साºया अनुभवाबाबत तो म्हणाला की, ते कोणतीही गोष्ट गांभीर्याने घेतात. नियमांचे काटेकोर पालन करतात. तोच नियम मी पाळत आहे. आज मी नांदगावच्या घरातून काम करत आहे, असे या व्यक्तीने सांगितले.
नांदगावला आल्यावर येथील डॉ. रोहन बोरसे यांना त्याने आपल्या आरोग्याची माहिती दिली. त्यांनीसुद्धा तपासणी केली. कोरोनाला घाबरायचं नाही. पण काळजी घ्यायची, आपल्याला होणार नाही आणि दुसºयालाही होणार नाही, असे मत त्याने व्यक्त केले. कोरोना होऊच नये; परंतु तशी वेळ आलीच तर तो कुटुंबापुरताच मर्यादित राहावा. समाजात त्याचा संसर्ग पसरू नये. या विचारांवर आधारित जीवनशैली गेली तीन आठवडे जगतांना या कुटुंबाने एक आदर्श निर्माण केला आहे.

Web Title: Volunteer Home Quarantine from Japan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.