नाशिक महापालिकेत दोन अभियंत्याची स्वेच्छानिवृत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 07:31 PM2020-02-14T19:31:55+5:302020-02-14T19:34:25+5:30
नाशिक- महापालिकेत अधिकाऱ्यांच्या निवृत्तीपाठोपाठ स्वेच्छानिवृत्तीचे सत्र सुरूच असून शहर अभियंता संजय घुगे यांच्या पाठोपाठ उपअभियंता आर. एस. पाटील यांनी देखील अर्ज दिला आहे. येत्या महासभेत यासंदर्भात फैसला होणार आहे.

नाशिक महापालिकेचा आकृतीबंध शासनाच्या दरबारी अनेक दिवसांपासून पडून आहे. गेल्या आणि या सरकारमध्ये देखील पाठपुरावा करून उपयोग झालेला नाही. त्यातच दर महिन्याला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे स्वेच्छानिवृत्तीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे कामकाजाचा ताण वाढत आहे. नगरसेवक आणि पदाधिका-यांची अपेक्षीत काम करणे शक्य नसल्याने देखील अधिकारी ताण तणाावात असतात. सतत होणा-या बैठका, पदाधिकारी आणि अधिका-यांनी बोलविल्यानंतर क्षेत्रीय कामकाजाच्या ठिकाणी जाणे अशा अनेक प्रकारांमुळे अधिकारी त्रस्त झाले आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून कामकाजाचा ताण वाढत असल्याने अनेक अधिका-यांनी स्वेच्छानिवृत्तीचे अर्ज दिले आहेत. आता शहर अभियंता संजय घुगे यांच्या पाठोेपाठ उपअभियंता आर. एस. पाटील यांनी देखील अर्ज दिला आहे. दोन्ही अभियंत्यांनी व्यक्तीगत कारणे दिली आहेत. नियुक्ती प्राधीकरण महासभा असल्याने त्यांचे अर्ज येत्या मंगळवारी (दि.१८) होणा-या महासभेत सादर होणार आहे.