चौव्हाण शाळेत मतदान जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 12:19 AM2019-03-23T00:19:39+5:302019-03-23T00:19:54+5:30
श्रीमती र. ज. चौव्हाण बिटको गर्ल्स हायस्कूलमध्ये मतदान जनजागृती व्याख्यान, चित्रकला स्पर्धा व मतदान जनजागृतीपर पथनाट्य पार पडले.
नाशिकरोड : श्रीमती र. ज. चौव्हाण बिटको गर्ल्स हायस्कूलमध्ये मतदान जनजागृती व्याख्यान, चित्रकला स्पर्धा व मतदान जनजागृतीपर पथनाट्य पार पडले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक संजीवनी धामणे, उपमुख्याध्यापक सुरेश दीक्षित, पर्यवेक्षक माधव मुठाळ आदी मान्यवर उपस्थित होते. शिक्षक राजेंद्र पांडे यांनी विद्यार्थिनींना मतदानाचे महत्त्व व जागरूकता याविषयावर व्याख्यान दिले. ‘मतदार राजा जागा हो, मतदानासाठी तयार हो, मतदान करा हमखास विकास होईल झकास, चला मतदान करून राष्ट्रीय कर्तव्याचे बीज रोवू या’ अशा घोषणा देत विद्यार्थिनींनी नातेवाईक, शेजारी-पाजारी यांना मतदानासाठी प्रवृत्त करण्याचा निर्धार केला. यावेळी विद्यार्थिनींनी ‘मतदान आहे हक्क माझा’ हे पथनाट्य सादर केले. पथनाट्याचे लेखन व दिग्दर्शन शिक्षिका पूनम पानसरे यांनी केले. आठवीच्या विद्यार्थिनींसाठी मतदान जनजागृती या विषयावर चित्रकला स्पर्धा शिक्षिका सोनाली मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.