नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघासाठी मतदार यादी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 01:39 AM2018-04-28T01:39:41+5:302018-04-28T01:39:59+5:30

विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी ६४४ मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, त्यावर दोन दिवस हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. नामांकन दाखल करण्याच्या अंतिम दिवसाच्या अगोदर अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी नाशिक जिल्ह्णातील नाशिक महापालिका, मालेगाव महापालिका तसेच नगरपालिका, नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक मतदार असून, जिल्हा परिषदेचे सदस्य व पंचायत समितीचे सभापतींनाही मतदानाचा हक्क बहाल करण्यात आला आहे.

Voter list for Nashik Local Government Institute for the constituency | नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघासाठी मतदार यादी जाहीर

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघासाठी मतदार यादी जाहीर

googlenewsNext

नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी ६४४ मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, त्यावर दोन दिवस हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. नामांकन दाखल करण्याच्या अंतिम दिवसाच्या अगोदर अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी नाशिक जिल्ह्णातील नाशिक महापालिका, मालेगाव महापालिका तसेच नगरपालिका, नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक मतदार असून, जिल्हा परिषदेचे सदस्य व पंचायत समितीचे सभापतींनाही मतदानाचा हक्क बहाल करण्यात आला आहे. देवळाली कॅन्टोंमेट बोर्डाचे शासन नियुक्त सदस्यांना मतदानाचा हक्क नाही, मात्र सर्व स्वीकृत सदस्यांना हा अधिकार आहे. प्रारंभी या निवडणुकीसाठी ६५१ मतदार असल्याचे सांगण्यात येत होते, परंतु त्यातून कॅन्टोंमेंट बोर्डाचे नियुक्त सदस्य वगळण्यात आले, तर सटाणा नगरपालिकेच्या दोन सदस्यांची नवीन भर पडली आहे. निफाड नगरपंचायतीचे एक सदस्य मयत झाल्याने त्यांचे पद रिक्त आहे. अशा प्रकारे ६४४ मतदारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या मुख्यालयात पाहण्यासाठी यादी ठेवण्यात आली आहे. या यादीवर हरकती, सूचनांनंतर दि. २ मे रोजी अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

Web Title: Voter list for Nashik Local Government Institute for the constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.