मतदार याद्यांमध्ये २६ हजार दुबार, मयत नावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 01:18 AM2019-06-29T01:18:53+5:302019-06-29T01:19:14+5:30
अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्दोष आणि पारदर्शन पद्धतीने पार पडावी यासाठी निवडणूक शाखेकडून दक्षता घेण्यात येत असून, मतदार याद्यांशी संबंधित कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे.
नाशिक : अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्दोष आणि पारदर्शन पद्धतीने पार पडावी यासाठी निवडणूक शाखेकडून दक्षता घेण्यात येत असून, मतदार याद्यांशी संबंधित कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे. जिल्ह्णातील मतदार याद्यांची पडताळणीमध्ये सुमारे २६ हजार नावे दुबार आणि मयत आढळली असून, सदर नावे वगळण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणूक-२०१९ मधील अनुभवानंतर निवडणूक शाखेकडून काळजी घेतली जात असून, गेल्या काही महिन्यांपासून मतदार याद्यांच्यी पडताळणीच्या कामाला प्राधान्य देण्यात आले आहे. या कामाबरोबरच मतदार यादी शुद्धीकरण व नोंदणी, मतदान केंद्रांचा आढावा, मनुष्यबळ व्यवस्थापन, दिव्यांग मतदार कल्याण यांसह मतदार जागृती तसेच संपूर्ण विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीबाबत कामे येत्या काही दिवसांत केली जाणार आहेत. या संदर्भात विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी-देखील कामकाजाचा आढावा घेतलेला आहे. विधानसभा निवडणूक पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे.
जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या पडताळणीत सुमारे २६,३०१ इतकी नावे ही मयत आणि दुबार आढळून आली असून, आणखी जवळपास २५ हजार नावे अतिरिक्त निघण्याची शक्यता आहे. मतदारांकडून मतदार यादीतील नावांसंदर्भात अपेक्षित आणि वेळोवेळी काळजी घेतली जात नसल्यामुळे दुबार आणि मयत मतदारांची नावे यादीत कायम राहतात. यंदा ही संख्या मोठी असल्याचे सुरू असलेल्या पडताळणीत आढळून आले आहे.
यामध्ये सिन्नरमध्ये सर्वाधिक नावे आढळून आले असून, चांदवड, मालेगाव आणि दिंडोरीत काही हजारांमध्ये दुबार आणि मयतांची नावे आढळून आली आहेत. सिन्नर मतदारसंघात तब्बल ५७३०, मालेगाव मध्य आणि बाह्ण या दोन्ही मिळून सुमारे पाच हजार नावे सापडली. चांदवडमध्ये ३९४२, येवलामध्ये २०५२, दिंडोरीत ३८०७, कळवणला ११२१ अशी नावे पडताळणीत आढळून आली
आहेत.
याद्यांची पडताळणी
मतदार याद्यांच्या पडताळणीत नांदगावमध्ये १९२७, मालेगाव (मध्य) २९५८, मालेगाव (बाह्य) २०८१, बागलाण ४३४, कळवण ११२१, चांदवड ३९४२, येवला २०५२, सिन्नर ५७३०, निफाड १००, दिंडोरी ३८०७, नाशिक पूर्व ३३७, नाशिक मध्य ४६३, नाशिक पश्चिम ४१४, देवळाली ११७, तर इगतपुरी या मतदारसंघात ८१८ इतकी नावे दुबार तसेच मयत मतदारांची आढळून आली आहेत.
१ जुलैपासून मतदार जागृती
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या पूर्वतयारीनुसार शुक्रवारी जिल्ह्णातील सर्व निवडणूक नायब तहसीलदार यांची बैठक उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या दालनात पार पडली. या बैठकीत ठरल्यानुसार येत्या १ जुलैपासून मतदार जागृती मोहीम हाती घेतली जाणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश निवडणूक अधिकाºयांनी दिली.