इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकवर मतदान जनजागृती रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 01:03 AM2019-04-16T01:03:37+5:302019-04-16T01:06:38+5:30
लायन्स क्लब आॅफ नाशिक कार्पोरेट, मानवता हेल्प फाउंडेशन व नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकवर ‘मतदान एक राष्ट्रीय कर्तव्य’ मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली होती.
इंदिरानगर : लायन्स क्लब आॅफ नाशिक कार्पोरेट, मानवता हेल्प फाउंडेशन व नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकवर ‘मतदान एक राष्ट्रीय कर्तव्य’ मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली होती.
इंदिरानगर येथील जॉगिंग ट्रॅकवर सकाळी इंदिरानगर, साईनाथनगर, दीपालीनगर, सुचितानगर यांसह परिसरातून युवक-युवती, महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने फेरफटका मारण्यासाठी येतात. त्यांच्यामध्ये जनजागृती करून मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी या उपक्र मातून मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करावे, असे आवाहन करण्यात आले. या रॅलीस नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच रॅलीत सर्व नागरिकांना मतदान करण्याविषयी शपथ देण्यात आली. या रॅलीत लायन्स क्लबचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे, सागर बोंडे, अशोक वनारा, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण खाबिया, डॉ. मनीषा रौंदळ, डॉ. नितीन रौंदळ, चंद्रकांत नाईक तसेच मानवता हेल्प फाउंडेशनचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पारनेरकर, साधना दुसाने, सतीश लोहारकर, अविनाश कुलकर्णी, अवधूत कुलकर्णी, रवींद्र दुसाने यांनी सहभाग नोंदविला.