मतदार नोंदणीचा अर्ज हवा, कार्यालयात या !

By श्याम बागुल | Published: September 21, 2018 03:40 PM2018-09-21T15:40:56+5:302018-09-21T15:44:03+5:30

नवीन मतदार नोंदणीसाठी सध्या निवडणूक आयोगाची मोहिम सुरू असून, बीएलओंना घरोघरी पाठवून नवीन मतदारांची नोंदणी तसेच मतदार यादीतील दुरूस्त्यांचे काम हाती घेण्यात आले आहे. मतदार जागृतीसाठी गावोगावी प्रचार रथही फिरवून नागरिकांना त्यात सहभागी करून घेतले जात असताना

Voter registration application form, this in office! | मतदार नोंदणीचा अर्ज हवा, कार्यालयात या !

मतदार नोंदणीचा अर्ज हवा, कार्यालयात या !

googlenewsNext
ठळक मुद्देनाशिक ‘मध्य’च्या निवडणूक शाखेकडून एकाला एकच अर्ज पेट्रोलचे दर नव्वदीच्या पार गेल्याने एक अर्ज घेण्यासाठी एक लिटर पेट्रोल वाया

नाशिक : मतदार जनजागृती व नवीन मतदार नोंदणी करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून हरत-हेचे प्रयत्न केले जात असताना, प्रत्यक्षात निवडणूक शाखेचे कामकाज पाहणाऱ्या अधिकारी, कर्मचा-यांची मात्र त्याबाबतची उदासिनता कायम असून, त्याचा प्रत्यय अनेक जागरूक मतदारांना येवू लागला आहे. सध्या गणेशोत्सव सुरू असल्यामुळे काही मंडळांनी सामाजिक भान व राष्टÑीय कर्तव्य म्हणून आपल्या भागातील गणेश भक्तांची मतदार नोंदणी करण्यासाठी मध्य मतदार संघाच्या कार्यालयात मतदार नोंदणीचे अर्ज मागितले असता, ‘एका व्यक्तीला एकच अर्ज’ असा हिशेब ठेवून अनेक भक्तांना परत पाठविण्यात आले आहे.
नवीन मतदार नोंदणीसाठी सध्या निवडणूक आयोगाची मोहिम सुरू असून, बीएलओंना घरोघरी पाठवून नवीन मतदारांची नोंदणी तसेच मतदार यादीतील दुरूस्त्यांचे काम हाती घेण्यात आले आहे. मतदार जागृतीसाठी गावोगावी प्रचार रथही फिरवून नागरिकांना त्यात सहभागी करून घेतले जात असताना दुसरीकडे मात्र सरकारी यंत्रणेचा नागरिकांना वेगळाच अनुभव येवू लागला आहे. मुळात शहरी भागातील मतदार संघ विस्तारलेला असल्यामुळे मतदार नोंदणीचा अर्ज घेण्यासाठी तहसिल कार्यालयात येण्यास मतदार अनुत्सूक असतो, त्यामुळे गणेशोत्सवात सहभागी होणाºया परिसरातील भाविकांना सायंकाळच्या आरतीच्या वेळी मतदार नोंदणी करून घेण्याचे आवाहन काही मंडळांनी करून त्यासाठी मतदारांना अर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी काही जागरूक नागरिकांनी नाशिक तहसिल कार्यालयात असलेल्या मध्य विधानसभा मतदार संघाच्या कार्यालयात जावून मतदार नोंदणीच्या अर्जांची मागणी केली असता, एका व्यक्तीला एकच अर्ज दिला जाईल असे उत्तर देण्यात आले, शिवाय ज्याला मतदार नोंदणी करायची असेल त्यालाच अर्ज घ्यायला पाठवा असा सल्लाही देवून कार्यकर्त्यांना माघारी पाठविण्यात आले. त्यामुळे हिरमुसलेल्या कार्यकर्त्यांना आल्या पावली परत फिरावे लागले. सध्या पेट्रोलचे दर नव्वदीच्या पार गेल्याने एक अर्ज घेण्यासाठी एक लिटर पेट्रोल वाया घालविण्यास कोणी तयार होत नाही, त्यातही पुन्हा मतदाराचे निवासस्थान व मतदार नोंदणी अधिका-यांचे कार्यालयाचे अंतर पाहता, स्वत:हून पदरमोड करण्यास कोणी तयार होत नाही. शिवाय मतदान केंद्रांवर मतदार नोंदणीचा अर्ज मिळत नाही, ब-याच बीएलओंकडेही पुरेसे अर्ज नसल्यामुळे निवडणूक शाखेने तलाठी कार्यालये, रेशन दुकानांमध्ये अर्ज ठेवल्यास त्याचा परिसरातील मतदार व नागरिकांना चांगलाच लाभ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Voter registration application form, this in office!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.