नाशिक तालुक्यासाठी मतदानयंत्रे रवाना
By admin | Published: February 20, 2017 11:24 PM2017-02-20T23:24:07+5:302017-02-20T23:24:24+5:30
१६० मतदान केंद्र : ७५० अधिकारी, कर्मचारी नियुक्त
नाशिक : जिल्हा परिषदेच्या नाशिक तालुक्यातील आठ गण व चार गटांसाठी सोमवारी (दि.२०) पंचायत समितीच्या कार्यालयातून मतदानयंत्रे व साहित्य सकाळीच रवाना करण्यात आले. तालुक्यात एकूण १३० मतदान केंद्र असून, त्यासाठी २६० मतदानयंत्रे पुरविण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उन्मेश महाजन यांनी दिली. तालुक्यात गिरणारे, गोवर्धन, पळसे व एकलहरे या चार गटांसाठी तसेच गिरणारे, देवरगाव, गोवर्धन, विल्होळी, पळसे, सिद्धप्रिंपी, एकलहरे व लहवित या आठ गणांसाठी मंगळवारी (दि.२१) मतदान होणार आहे. सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे.
नाशिक तालुक्यासाठी नियुक्त केलेल्या सुमारे ७५० अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता नाशिक तालुका पंचायत समिती कार्यालयात बोलावून निवडणुकीचे साहित्य तसेच मतदानयंत्रे सील करून त्यांच्या ताब्यात देण्यात आली. (प्रतिनिधी)