मतदारांचा सेल्फीसाठी उत्साह ;तरुणांसह जेष्ठांनाही सेल्फीवॉलचे आकर्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 02:31 PM2019-10-21T14:31:29+5:302019-10-21T19:21:37+5:30

Maharashtra Election 2019नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघातील महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी (मेरी), आरपी विद्यालय, मखमलाबाद नाका, गणेशवाडीतील आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय, मखमलाबाद , पेठरोड आदि विविध मतदान केंद्रावर मतदारांनी मतदानानंतर आपले बोट दाखवत सेल्फी काढण्याचा उत्साह दिसून आला

Voters' enthusiasm for selfie after voting | मतदारांचा सेल्फीसाठी उत्साह ;तरुणांसह जेष्ठांनाही सेल्फीवॉलचे आकर्षण

मतदारांचा सेल्फीसाठी उत्साह ;तरुणांसह जेष्ठांनाही सेल्फीवॉलचे आकर्षण

Next
ठळक मुद्देमतदानानंतर सेल्फी काढण्याची उत्सूकता मतदारांमध्ये दिसून आला सेल्फीचा उत्साहतरुण, तरुणींसह महिला व ज्येष्ठांनाही आकर्षण

नाशिक : विधानसभा निवडणुकीत नाशिक शहरात सकाळपासून विविध मतदान केंद्रांवर मतदारांचा उत्साह दिसून येत असताना मतदान झाल्यानंतर मतदारांनी मतदानाच्या आठवणी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी सेल्फी काढण्याचाही उत्साह   दाखविल्याने विविध मतदान केंद्रावर मतदानानंतर सेल्फीसाठीही मतदारांची गर्दी दिसून आली. अधिक मतदार संख्या असलेल्या केंद्रावर प्रशासनाकडून दोन ते तीन सेल्फी वॉलचे नियोजन केल्यामुळे मतदारांना लवकर सेल्फी घेऊन मतदान केंद्राबाहेर पडता आले. 
शहरातील नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघातील महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी (मेरी), आरपी विद्यालय, मखमलाबाद नाका, गणेशवाडीतील आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय, मखमलाबाद , पेठरोड आदि विविध मतदान केंद्रावर मतदारांनी मतदानानंतर आपले बोट दाखवत सेल्फी काढण्याचा उत्साह दिसून आला. यात महिला, तरुण, तरुणींसह ज्येष्ठ नागरिकांचाही उत्साह ओसंडून वाहताना दिसून आला. अनेक मतदारांनी मतदान झाल्यानंतर सेल्फी काढले. तर काही मतदारांनी आपले बोट धाखवत व्हिडीओ  काढून ते सोशल मिडियावर शेअर करीत अन्य नागरिकांनाही मतदान करण्याचे आवाहन केले. मतदानासाठी आलेल्या दाम्पत्यांनही सेल्फी वॉलमागे उभे राहून सेल्फी काढून घेत विधानसभा निवडणूक 2019 मधील मतदानाच्या आठवणी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केल्या.  

Web Title: Voters' enthusiasm for selfie after voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.