कोरोनाला न घाबरता मतदार पडले घराबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 08:55 PM2021-01-15T20:55:16+5:302021-01-16T01:12:36+5:30

सिन्नर : तालुक्यातील ९० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सिन्नर तालुक्यातील मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. दुपारी ३.३० वाजेपर्यंत ७३ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. कोरोनाला न घाबरता मतदार उत्स्फूर्तपणे मतदान केंद्रावर येत होते. मात्र, उत्साहाच्या भरात त्यांच्याकडून पाहिजे त्या प्रमाणात नियम पाळले जात नसल्याचे चित्र तालुक्यात दिसून आले. एकमेकांचे हस्तांदोलन, गळाभेट आणि टाळ्या देऊन गप्पाटप्पा अनेक ठिकाणी सुरू असल्याचे दिसून आले. मतदारांनी कोरोनाला न घाबरता लोकशाहीचा हक्क बजावला. मात्र, काही प्रमाणात का होईना नियमांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले.

Voters fell out of the house without fearing Corona | कोरोनाला न घाबरता मतदार पडले घराबाहेर

कोरोनाला न घाबरता मतदार पडले घराबाहेर

Next
ठळक मुद्देसिन्नर तालुका : उत्स्फूर्त प्रतिसाद; उत्साहाच्या भरात नियमांकडे दुर्लक्ष

दुपारी दीड वाजेपर्यंत सिन्नर तालुक्यात सुमारे ५७ टक्के मतदान झाले होते. सकाळी साडेनऊ वाजता १५ टक्के, तर साडेअकरा वाजता ३७ टक्के मतदान झाले होते. तालुक्यात दुपारी ४ वाजेपर्यंत शांततेत मतदान सुरू होते. दुपारी ४ वाजेनंतर मतदानाचा वेग वाढला. मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर त्यातील १० ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. तर, ३३८ प्रभागांंत ९२० जागा होत्या. त्यातील २३८ जागा बिनविरोध झाल्या होत्या. तालुक्यातील ९० ग्रामपंचायतींच्या २८९ मतदान केंद्रांवर शांततेत मतदान पार पडले. ६९२ जागांसाठी १७२९ उमेदवारांचे भवितव्य सायंकाळी साडेपाच वाजता ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले.
सकाळपासूनच तालुक्यात मतदानाचा वेग चांगला दिसून आला. पहिल्या दोन तासांंत १५ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर, मतदानाचा वेग वाढतच गेला. वयोवृद्ध मतदारांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ दिसून येत होती. ९० ग्रामपंचायतींच्या २८९ मतदान केंद्रांवर सिन्नर, एमआयडीसी व वावी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. प्रत्येक वॉर्डात चुरशीची निवडणूक असल्याने एकेका मतासाठी रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत होते. प्रत्येक मतदान केंद्रावर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या. आलेल्या मतदारांचे तापमान घेणे, ऑक्सिमीटरने मोजणी करणे आदी कामे केली जात होती. मात्र, मतदारांच्या तुलनेत आशा कार्यकर्त्या कमी असल्याने व दुपारी मतदारांनी गर्दी केल्याने सर्वांचीच तपासणी शक्य होत नव्हती. तालुक्यातील वडांगळी, वावी, दोडी, देवपूर, पंचाळे, सोमठाणे, पांगरी, मुसळगाव, माळेगाव, दापूर, नायगाव या मोठ्या गावांमध्ये प्रचंड चुरस दिसून येत होती. येणा-या मतदारांची हात जोडून विनवणी केली जात होती.
शेवटच्या दोन तासांत मतदारांची बॅटिंग
सिन्नर तालुक्यात दुपारी दीड वाजेपर्यंत ५७ टक्के मतदान झाले होते. सकाळपासूनच मतदारांची गर्दी होती. मात्र, दुपारी ४ वाजेनंतर मतदारांनी मतदान केंद्रांबाहेर रांगा लावल्याचे चित्र तालुक्यातील अनेक मतदान केंद्रांंवर दिसून आले. शेवटच्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांकडून मेहनत घेतली जात होती. प्रत्येक मतदाराला मतदान केंद्रावर आणण्यासाठी प्रत्येकाचा आटापिटा सुरू असल्याचे चित्र अनेक मतदान केंद्रांवर दिसून आले.

Web Title: Voters fell out of the house without fearing Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.