मतदार याद्यांमध्ये घोळ

By admin | Published: September 16, 2015 11:13 PM2015-09-16T23:13:05+5:302015-09-16T23:14:21+5:30

चांदवड नगर परिषद : दुरूस्तीची मागणी

In the voters' list | मतदार याद्यांमध्ये घोळ

मतदार याद्यांमध्ये घोळ

Next

चांदवड : चांदवड नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदार याद्या नुकत्याच प्रसिद्ध झाल्या
असून, त्या मतदार याद्यांमध्ये सर्वच्या सर्व १ ते १७ प्रभागातील याद्या चुकीच्या असून, बाहेरील
मतदारांचा समावेश केल्याने सर्वच प्रभागातील मतदार याद्यांना हरकत घेण्यात आली असून, या याद्या त्वरित सुधारित कराव्यात, अशी मागणी चांदवड शहर शिवसेनेचे शहरप्रमुख जगन्नाथ राऊत यांनी चांदवड नगर परिषदेचे प्रशासक तथा तहसीलदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
नगर परिषदेचे मंजूर प्रभाग रचनेप्रमाणे व लोकसंख्येनुसार समान मतदारसंख्या नसल्याने तसेच चुकीची मतार यादीस शिवसेनेच्या वतीने हरकत घेण्यात आली. या मतदार याद्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहेत. जे मतदार चांदवड शहरातून बदलून गेले, काही मतदार मयत झाले तर काही मतदार या प्रभागातून दुसऱ्या प्रभागात राहण्यास गेले त्यांची नावे इतरत्र आहेत. तर काहीची नावेच नाही असा प्रकार घडल्याने सर्र्र्वत्र नाराजीचा सुर आहे. मतदार याद्या या कोणत्यातरी राजकीय पक्षाच्या दबावाखाली तयार केल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.
चांदवड नगरपरिषदेची निवडणुक २०१५ च्या मंजुर प्रभाग रचनेप्रमाणे मतदार यादी नसून त्यामध्ये प्रभागाबहेरील मतदारांचे नावाचा समावेश करुन तसेच चांदवडच्या बाहेरील मतदारांचा समावेश करण्यात आला आहे.
सदरच्या याद्या प्रभाग रचनेनुसार तसेच प्रभागात वास्तवास असलेल्या मतदारांचाच समावेश करावा तसेच प्रभागाबाहेरील व चांदवड शहराबाहेरील मतदारांचे नावे वगळुन पुनश्च प्रभाग रचनेनुसार समान मतार संख्येचे प्रभाग बनवावे अशी मागणी जगन्नाथ राऊत यांनी निवेदनात केली आहे. (वार्ताहर)

Web Title: In the voters' list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.