मतदार यादीत १९८४ मतदारांची आडनावेच !
By admin | Published: January 22, 2017 11:16 PM2017-01-22T23:16:25+5:302017-01-22T23:16:44+5:30
गंभीर चुका : नावांपुढे छायाचित्रे नाहीत
नाशिकरोड : प्रभाग २१ च्या प्रारूप मतदार यादीत अनेक गंभीर चुका झाल्या असून, १९८४ मतदारांची फक्त आडनावेच दिली असून, २५६० मतदारांच्या नावापुढे फोटो प्रसिद्ध केलेला नाही. यामुळे निवडणुकीत गोंधळ होण्याची शक्यता असून, सुधारित मतदार यादी प्रसिद्ध करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. शिवसेनेचे मसूद जिलानी यांनी मनपा आयुक्त व निवडणूक आयोगाला पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग २१ मधील मूळ प्रारूप व पुरवणी मतदार यादीमध्ये १९८४ मतदारांची फक्त आडनावेच छापली आहेत. तसेच मूळ प्रारूप यादीत ३८० व पुरवणी यादीत २१८४ असे एकूण २५६० मतदारांच्या नावापुढे त्यांचे छायाचित्र प्रसिद्ध केलेले नाही. सिडको येथील ६ व प्रभाग १९ मधील ३ रहिवाशांची नावे या मतदार यादीत प्रसिद्ध करण्यात आली आहे. ७०० हून अधिक दुबार नावेदेखील मतदार यादीत आहेत. तसेच चार वर्षांपूर्वी दत्तमंदिररोड येथील हटविलेल्या मुक्तिधाम झोपडपट्टीतील १५० मतदारांची नावेदेखील मतदार यादीत दाखविण्यात आली आहेत. यामुळे मोठा गोंधळ होणार आहे.
सून, प्रचार करताना उमेदवारांना संबंधित मतदार सापडणे मुश्कील होणार आहे. त्यामुळे याची गंभीर दखल घेऊन सुधारित नवीन मतदार यादी प्रसिद्ध करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. (प्रतिनिधी)