मतदार माहितीत नाशिक राज्यात दुसºया क्रमांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 12:13 AM2018-01-02T00:13:55+5:302018-01-02T00:17:55+5:30

नाशिक : भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदार पुनरीक्षण मोहिमेंतर्गत मतदारांची घरोघरी जाऊन माहिती गोळा करण्याच्या विशेष मोहिमेत नाशिकने राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला असून, सुमारे ४ लाख ९० हजार घरांना भेटी देऊन मतदारांची अद्ययावत माहिती संकलित करण्यात आली आहे. या मोहिमेत बीड जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे. अन्य मोठ्या शहरांमध्ये नाशिकच अग्रेसर आहे.

In the voters' list, the second highest in the state of Nashik | मतदार माहितीत नाशिक राज्यात दुसºया क्रमांकावर

मतदार माहितीत नाशिक राज्यात दुसºया क्रमांकावर

googlenewsNext
ठळक मुद्देबीड प्रथम : मतदारांची माहिती गोळासुमारे ४ लाख ९० हजार घरांना भेटीमतदारांची अद्ययावत माहिती संकलित

नाशिक : भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदार पुनरीक्षण मोहिमेंतर्गत मतदारांची घरोघरी जाऊन माहिती गोळा करण्याच्या विशेष मोहिमेत नाशिकने राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला असून, सुमारे ४ लाख ९० हजार घरांना भेटी देऊन मतदारांची अद्ययावत माहिती संकलित करण्यात आली आहे. या मोहिमेत बीड जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे. अन्य मोठ्या शहरांमध्ये नाशिकच अग्रेसर आहे.
१ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत भारतीय निवडणूक आयोगाने मतदार पुनरीक्षण मोहीम राबविली. प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय मतदारयाद्यांचे अद्यावतीकरण करण्याबरोबरच घरोघरी जाऊन मतदारांची माहिती संकलित करणे, नवीन मतदार नोंदणी करणे, दुबार नाव वगळणे, मतदार केंद्रांचे स्थलांतर करणे, मतदाराच्या घरी गेल्यावर त्याचे अक्षांश, रेखांश जोडणे अशाप्रकारचे कामे केंद्रस्तरीय अधिकाºयांच्या (बीएलओ) मदतीने पार पाडण्याच्या आयोगाच्या सूचना होत्या, परंतु यंदा शिक्षकांनी हे काम करण्यास नकार दिल्याने मोठा अडथळा निर्माण झाला होता. शिक्षकांनी या कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. अशाही परिस्थितीत निवडणूक शाखेने शिक्षकांना कधी गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देऊन तर कधी अंजारून गोंजारून काम करण्यावर भर दिला होता. नाशिक जिल्ह्णातील एकूण साडेसात लाख घरभेटी देऊन माहिती गोळा करण्याच्या या मोहिमेत शेवटच्या टप्प्यात केंद्रस्तरीय अधिकारी सहभागी झाल्याने ३० डिसेंबरअखेर जवळपास ४,९०,५७५ घरांना भेटी देऊन माहिती गोळा केली आहे. राज्यात नाशिकने दुसरा क्रमांक पटकाविला आहे.
निवडणूक आयोगाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्णाने या संदर्भात केलेल्या माहितीचा गोषवारा प्रसिद्ध केला असून, त्यात बीड जिल्हा प्रथम असून, नाशिकनंतर अनुक्रमे सोलापूर, उस्मानाबाद, सांगली, अहमदनगर, जळगाव, पुणे, यवतमाळ व बुलढाणा आहे. या मोहिमेतील अद्ययावत माहितीच्या आधारे १० जानेवारी रोजी प्रसिद्ध होणाºया अंतिम मतदार यादी तयार केली जाणार आहे.

Web Title: In the voters' list, the second highest in the state of Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.