मतदारांना दोन लाख ‘स्मार्ट ओळखपत्र’ वाटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 12:46 AM2019-03-11T00:46:33+5:302019-03-11T00:46:58+5:30
निवडणूक आयोगाने राबविलेल्या मतदार नोंदणी अभियानांतर्गत जिल्ह्यात जुलै ते डिसेंबर या काळात मतदार नोंदणी केलेल्या व अंतिम मतदार यादीत नाव समाविष्ट असलेल्या मतदारांसाठी निवडणूक आयोगाने स्मार्ट निवडणूक ओळखपत्र तयार केले असून, लवकरच प्रत्येक तालुकानिहाय त्याचे वाटप करण्यात येणार आहे.
नाशिक : निवडणूक आयोगाने राबविलेल्या मतदार नोंदणी अभियानांतर्गत जिल्ह्यात जुलै ते डिसेंबर या काळात मतदार नोंदणी केलेल्या व अंतिम मतदार यादीत नाव समाविष्ट असलेल्या मतदारांसाठी निवडणूक आयोगाने स्मार्ट निवडणूक ओळखपत्र तयार केले असून, लवकरच प्रत्येक तालुकानिहाय त्याचे वाटप करण्यात येणार आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक शाखेतर्फे विशेष मोहीम राबविण्यात येत असून, दोन लाखांपेक्षा अधिक मतदारांना स्मार्ट निवडणूक ओळखपत्र देण्यात येणार आहे. त्यासाठी एकूण २ लाख ६ हजार १५६ स्मार्ट ओळखपत्र प्राप्त झाले आहेत. निवडणूक शाखेतर्फे विधानसभा मतदारसंघनिहाय वितरित करण्यात येत आहेत.
नांदगाव १२३७१, मालेगाव मध्य २३६१५, मालेगाव बाह्य १२७७८, बागलाण १२८४१, कळवण-सुरगाणा ९९२५, चांदवड-देवळा ९२९३, येवला १११४७, सिन्नर ११९१७, निफाड ११३२५, दिंडोरी-पेठ १४४५२, नाशिकपूर्व २००४७, नाशिक मध्य १८२७८, नाशिक पश्चिम १५००५, देवळाली १२१६७ आणि इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात १०,९९५ ओळखपत्रांचे वाटप समन्वय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येत आहे.