सिडकोत २६९ बूथवर मतदानाची व्यवस्था
By Suyog.joshi | Updated: May 19, 2024 18:44 IST2024-05-19T18:44:11+5:302024-05-19T18:44:23+5:30
२६९ बूथवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली असून, या सर्व केंद्रांवर कर्मचारी दाखल झाले आहेत.

सिडकोत २६९ बूथवर मतदानाची व्यवस्था
सिडको, नाशिक (नरेंद्र दंडगव्हाळ) : सोमवारी होणाऱ्या मतदानासाठी सिडकोसह परिसरातील मतदान केंद्र सज्ज झाली आहेत. केंद्रांवर कर्मचारी दाखल झाले असून, मतदानासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. नाशिक पश्चिम या मतदारसंघात एकूण ४ लाख ५७ हजार ११२ इतके मतदान असून, यासाठी सिडको भागात ४७ शाळा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. सिडको, इंदिरानगर, पाथर्डीसह परिसरातील २६९ बूथवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली असून, या सर्व केंद्रांवर कर्मचारी दाखल झाले आहेत.
मतदान करण्यासाठी सिडकोतील माँसाहेब मीनाताई ठाकरे विद्यालय, विखे पाटील शाळा, विजय इंग्लिश मीडियम स्कूल, केबीएच विद्यालय पवननगर, एलव्हीएच विद्यालय, मनपा रायगड चौक शाळा, पेठे हायस्कूल, जनता विद्यालय, आदर्श विद्यालय, सिडको महाविद्यालय, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, मनपा शाळा गणेश चौक, मनपा हायस्कूल, मॉडर्न शाळा, ग्रामोदय हायस्कूल आदी सुमारे ४७ शाळांमध्ये मतदान होणार आहे. यासाठी राज्यासह इतर राज्यांतून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.