इंदिरा गांधी विद्यालयातर्फे मतदान जनजागृती अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 09:45 PM2019-10-05T21:45:56+5:302019-10-05T21:47:24+5:30

खर्डे : ता. देवळा येथील इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्यावतीने मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले. यानिमित्त विद्यालयाच्यावतीने संपूर्ण गावातून प्रभातफेरी काढण्यात आली.

Voting awareness campaign by Indira Gandhi Vidyalaya | इंदिरा गांधी विद्यालयातर्फे मतदान जनजागृती अभियान

खर्डे येथे मतदार जनजागृती निमित्ताने प्रभात फेरीत सहभागी विद्यार्थी व शिक्षक.

Next
ठळक मुद्देयेत्या २१ तारखेला मतदान करण्यासाठी आग्रह धरावा

खर्डे : ता. देवळा येथील इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्यावतीने मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले. यानिमित्त विद्यालयाच्यावतीने संपूर्ण गावातून प्रभातफेरी काढण्यात आली.
विद्यालयापासून प्रभातफेरी सुरू होण्यापूर्वी विद्यालयाचे प्राचार्य अंबादास देवरे यांनी मतदार जनजागृती करण्याचा उद्देश स्पष्ट केला व आपल्या परिवारातील मतदारांना येत्या २१ तारखेला मतदान करण्यासाठी आग्रह धरावा असे आवाहन केले.
विद्यार्थ्यांनी बॅनर हातात घेऊन घोषणा देत वातावरण निर्माण केले. यावेळी सरपंच, उपसरपंच तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह बी. व्हि. देवरे, खैरनार, आर. आर. खैरणार, प्राध्यापक संजय आहेर, आढाव, दळवी, महाले आदिंसह सर्व शिक्षक उपस्थित होते.
 

Web Title: Voting awareness campaign by Indira Gandhi Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.