विद्यार्थ्यांमार्फत मतदान जागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 12:48 AM2019-07-13T00:48:07+5:302019-07-13T00:48:25+5:30
आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९च्या पूर्वतयारीसाठी जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून जिल्ह्यातील शालेय, माध्यमिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमार्फत पालकांना प्रश्न मंजूषाद्वारे निवडणुकीबाबत मतदार यादी, विधानसभा मतदारसंघ, नावातील बदल, नवमतदाराचा मतदार यादीत समावेश तसेच मृत व्यक्तीचे नाव यादीतून वगळणे अशा स्वरुपाचे प्रश्न असणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सूरज मांढरे यांनी दिली़
नाशिक : आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९च्या पूर्वतयारीसाठी जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून जिल्ह्यातील शालेय, माध्यमिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमार्फत पालकांना प्रश्न मंजूषाद्वारे निवडणुकीबाबत मतदार यादी, विधानसभा मतदारसंघ, नावातील बदल, नवमतदाराचा मतदार यादीत समावेश तसेच मृत व्यक्तीचे नाव यादीतून वगळणे अशा स्वरुपाचे प्रश्न असणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सूरज मांढरे यांनी दिली़
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात झालेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २0१९ च्या मतदार जागृती आणि जिल्हा सुलभ निवडणुका व्यवस्थापन समितीच्या बैठकीत ते बोलत होते़ यावेळी समाज कल्याण सहायक आयुक्त प्राची वाजे, महानगरपालिका शिक्षणाधिकारी देवीदास महाजन अग्रणी बँक अधिकारी भरत बर्वे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुरेखा पाटील व विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते़
मांढरे म्हणाले, नाशिक जिल्ह्यामध्ये प्राथमिक, माध्यमिक विद्यालये आणि महाविद्यालयांमध्ये साधारणत: सहा ते सात लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत़ या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील साधारण पंचवीस लाख मतदारांपर्यंत पोहोचणे जिल्हा निवडणूक प्रशासनास शक्य होणार आहे़ त्यासोबतच नगरपालिका, सहकारी संस्था, विविध बँका, अंगणवाडी यांच्या माध्यमातूनही जिल्ह्यातील सर्व नागरिकांपर्यंत पोहोचून जिल्ह्यातील मयत मतदारांची नावे वगळण्याची मोहीम हाती घेण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले़
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आपला मतदाराचा हक्क कर्तव्य म्हणून बजावून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेल्या मोहिमेस सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी सूरज मांढरे यांनी केले़ उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी सादरीकरणाद्वारे स्वीप समितीच्या कामकाजाची माहिती दिली़ बैठकीच्या शेवटी निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार डॉ़ अमित पवार यांनी आभार मानले़
नाम में क्या रखा है?
जिल्ह्यातील सर्व दिव्यांग मतदारांचा शोध घेणे व दिव्यांग मतदारांची नोंदणी मतदार यादीमध्ये करून सर्व दिव्यांग मतदारांना आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सुलभ पद्धतीने मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात यावे़
४मतदार यादीचे शुद्धीकरण व दोषविरहित मतदार यादी तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे़ या मोहिमेचा एक भाग म्हणून नाम में क्या रखा है? हा अनोखा उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले़