आपट्याच्या पानांवर संदेश लिहून मतदान जागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 09:48 AM2019-10-07T09:48:23+5:302019-10-07T10:04:16+5:30

कब बुलबुलच्या विद्यार्थ्यांनी दसराच्या पार्श्वभुमिवर आपटयाच्या पानांवर मतदान जनजागृती विषयक संदेश लिहून त्याचे वाटप करत आर्वजुन मतदान करण्याची विनंती केली आहे.

Voting awareness was written by writing a message on the pages of Apatta | आपट्याच्या पानांवर संदेश लिहून मतदान जागृती

आपट्याच्या पानांवर संदेश लिहून मतदान जागृती

googlenewsNext
ठळक मुद्दे वृध्द असो वा जवान,अवश्य करा मतदानआद्य कर्तव्य भारतीयांचे, पवित्र कार्य मतदानाचेआन बान और शान से, सरकार बनती मतदान से

इंदिरानगर : सुखदेव प्राथमिक मराठी विदयामंदिर येथील कब बुलबुलच्या विद्यार्थ्यांनी दसराच्या पार्श्वभुमिवर आपटयाच्या पानांवर मतदान जनजागृती विषयक संदेश लिहून त्याचे वाटप करत आर्वजुन मतदान करण्याची विनंती केली आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणुन शासनस्तरावर तसेच सामाजिक संस्थांकडुन वेगवेगळे उपक्र म राबविले जातात त्याचाच एक भाग म्हणुन शाळेमार्फत हा उपक्रम राबविण्यात आला.
    वृध्द असो वा जवान,अवश्य करा मतदान. लोकशाहीची शान, तुमचे एक मतदान. आद्य कर्तव्य भारतीयांचे, पवित्र कार्य मतदानाचे. निर्भय होऊन मतदान, मताधिकाराचा सन्मान. उंगली पर काला निशान, समझदार नागरिक की पहचान. आन बान और शान से, सरकार बनती मतदान से. डरने की क्या बात है, जब पुलिस-प्रशासन साथ है. प्रजातंत्र से नाता है, हम भारत के मतदाता है. अशी घोषवाक्य आपटयाच्या पानांवर लिहुन लोकशाही परंपरा मजबुत करण्यासाठी कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता तसेच धर्म, जात, समाज, भाषा यांचा प्रभाव पडु न देता नक्की मतदान करा असा आग्रह नागरीकांना केला आहे. शाळेचे मुख्याध्यापक नितीन पाटील यांच्या संकल्पनेतुन राबविण्यात आलेल्या या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना कविता पवार, मनिषा बोरसे, सुनिल जाधव, संदीप नागरे, भारती जाधव, रेखा बागुल, अनिता आहिरे, प्रांजल चौधरी, सुचिता कंसारा, कविता धुमाळ यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Voting awareness was written by writing a message on the pages of Apatta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.