हात गमावलेल्या बाजीरावचे पायाने मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 01:34 AM2019-10-22T01:34:10+5:302019-10-22T01:35:13+5:30

Maharashtra Assembly Election 2019अपघातात दोन्ही हात गमावलेल्या बाजीराव मोजाड या नाशिक जिल्ह्यातील शिंगवे बहुला येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने मतदानाचे राष्टय कर्तव्य चक्क पायांच्या बोटांनी बजावले आणि मतदान अधिकाºयानेही बाजीराव याच्या पायांच्या बोटाला शाई लावत त्याच्या जिद्दीला सलाम ठोकला.

  Voting on Bajirao's feet that lost his hand | हात गमावलेल्या बाजीरावचे पायाने मतदान

हात गमावलेल्या बाजीरावचे पायाने मतदान

Next

नाशिक : अपघातात दोन्ही हात गमावलेल्या बाजीराव मोजाड या नाशिक जिल्ह्यातील शिंगवे बहुला येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने मतदानाचे राष्टय कर्तव्य चक्क पायांच्या बोटांनी बजावले आणि मतदान अधिकाºयानेही बाजीराव याच्या पायांच्या बोटाला शाई लावत त्याच्या जिद्दीला सलाम ठोकला. मतदानाच्या दिवशी घरात बसणाºया अथवा सुटीचे निमित्त साधत पर्यटन करणाºया धडधाकटांपुढे नाशिकच्या या बाजीराव सिंघमने एक आदर्श वस्तुपाठही ठेवला.
देवळाली मतदारसंघातील शिंगवे बहुला येथील अल्पभूधारक शेतकरी बाजीराव नामदेव मोजाड हे शेतीसह जोडीला अनेक कामे करतात. २००८ मध्ये गहू कापणीच्या वेळी मशीनवर काम करताना अपघात झाला आणि त्यात दोन्ही हात गमावले. बाजीराव अपघातानंतर जिद्दीने पुन्हा उभा राहिला. त्याच्या हाताची जागा पायांनी घेतली आणि पायांच्या साहाय्याने तो दैनंदिन कामे करू लागला. दोन्ही हात गमावल्यानंतर बाजीराव यांना मतदान करता आले नव्हते. यंदा मात्र, सर्वत्र होणारी मतदार जागृती पाहता बाजीरावाच्या मनानेही मतदान करण्याचा निर्धार केला. सोमवारी (दि. २१) शिंगवे बहुला येथे बाजीराव मतदानासाठी गेला असता, त्याची स्थिती पाहून मतदान अधिकारीही बुचकळ्यात पडले. दोन्ही हात गमावलेला बाजीराव मतदान कसे करणार, असा प्रश्न उपस्थित साऱ्यांनाचा सतावू लागलेला असताना बाजीरावाने पायाने मतदान करण्याची इच्छा बोलून दाखविली. निवडणूक अधिकाºयाने त्याला मदतनीस देऊ केला; परंतु त्याचा उत्साह पाहून मतदान अधिकारी व कर्मचाºयांनीही तशी व्यवस्था केली आणि बाजीरावने पायांच्या बोटांनी मतदान यंत्रावर बटन दाबत मतदानाचा हक्क बजावला. मग निवडणूक कर्मचाºयानेही त्याच्या पायाच्या बोटाला शाई लावत मतदानाची कार्यवाही पूर्ण केली.
बाजीरावाच्या या जिद्दीचा आदर्श वस्तुपाठ मतदान केंद्रावर चर्चेचा ठरला. शिवाय, मतदान करण्यास टाळाटाळ करणाºयांनाही एक चपराक देऊन गेला.

 

Web Title:   Voting on Bajirao's feet that lost his hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.