नाशिक महापालिकेच्या पोटनिवडणूकीसाठी शांततेत मतदान सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 12:21 PM2020-01-09T12:21:56+5:302020-01-09T12:24:12+5:30
नाशिक- महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २२ व २६ मधील दोन जागांच्या पोटनिवडणूकीसाठी सकाळपासून शांततेत प्रारंभ झाला असून पहिल्या दोन तासात सरासरी चार टक्के मतदान झाले होते.
नाशिक- महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २२ व २६ मधील दोन जागांच्या पोटनिवडणूकीसाठी सकाळपासून शांततेत प्रारंभ झाला असून पहिल्या दोन तासात सरासरी चार टक्के मतदान झाले होते.
नाशिकरोड येथील प्रभाग क्रमांक २२ मधील भाजप नगरसेविका सरोज आहिरे यांनी विधानसभा निवडणूकीसाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता आणि त्यानंतर त्यांनी राष्टÑवादीकडून निवडणूक लढविली होती. तर सिडको विभागातील प्रभाग क्रमांक २६ मधील शिवसेना नगरसेवक दिलीप दातीर यांनीही राजीनामा देऊन मनसेकडून निवडणूक लढविली त्यामुळे या दोन रिक्त जागांसाठी आज पोटनिवडणूक होत आहे. सकाळपासूनच मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांची गर्दी असली तरी मतदारांचा मात्र जेमतेम प्रतिसाद आहे. नाशिकरोड विभागातील प्रभाग क्रमांक २२ मध्ये सकाळी पहिल्या दोन तासात अवघे ३.६ टक्के मतदान झाले होते तर सिडकोतील ही सुमारे चार टक्के मतदान झाल होते. सिडको भागात खुटवड नगर तसेच शिवशक्ती चौकातील अनेक मतदारांची नावे गायब असल्याने अडचण निर्माण झाली आहे.
या निवडणूकीत प्रभाग क्रमांक २२ मधुन राष्टÑवादीकडून जगदीश पवार, भाजपकडून डॉ. विशाखा शिरसाट, भाजप बंडखोर रामदास सदाफुले, कॉंग्रेस बंडखोर सारीका तीर यांच्यात प्रमुख लढत आहे. तर प्रभाग क्रमांक २६ मधून मनसेचे दिलीप दातीर, शिवसेनेचे मधूकर जाधव, भाजपचे कैलास आहिरे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मोहन जाधव यांच्यात प्रामुख्याने लढत होते.