राज्यात रमजानपूर्व संपणार मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 01:54 AM2019-03-13T01:54:01+5:302019-03-13T01:54:23+5:30

निवडणुकीवर ‘रमजान’चा सकारात्मक प्रभाव

Voting ends Ramadan in the state | राज्यात रमजानपूर्व संपणार मतदान

राज्यात रमजानपूर्व संपणार मतदान

Next

- अझहर शेख

नाशिक : मुस्लिम समाजाच्या दृष्टीने अनन्यसाधारण असे धार्मिक महत्त्व प्राप्त असलेल्या पवित्र रमजान पर्वाला ६ मेपासून प्रारंभ होण्याची शक्यता आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिला टप्प्याचे मतदान ११ एप्रिल, तर अखेरच्या चौथ्या टप्प्याचे मतदान २९ एप्रिल रोजी पार पडणार आहे.
रमजान पर्वमध्ये मुस्लिम बांधवांची दिनचर्या बदललेली पहावयास मिळते. १५ ते १६ तासांचे निर्जळी उपवास (रोजा) या काळात महिनाभर केले जातात. तसेच पाचवेळेच्या नमाजपठणासह रात्री उशिरापर्यंत ‘तरावीह’ची विशेष नमाज मुस्लीम बांधव पठण करतात. या महिन्यात उपासनेवर अधिकाधिक भर दिला जातो; मात्र मतदानप्रक्रियेत त्याचा कुठलाही अडसर निर्माण होत नाही. कारण देशभरात मतदानाची वेळ सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत असते. त्यामुळे या वेळेत जवळच्या मतदान केंद्रांवर जाऊन लोकशाहीचा अधिकार मुस्लीम नागरिकदेखील सहजरीत्या बजावू शकतात, असे नाशिक शहरातील धर्मगुरूंनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

महाराष्टÑात रमजानला प्रारंभ होण्याअगोदरच मतदान प्रक्रिया आटोपत आहे. त्यामुळे त्याचा कुठलाही परिणाम जाणवणार नाही. तसेच काही राज्यांत निवडणुकीच्या तारखा रमजान पर्वकाळात येत असल्या तरी त्याचा फारसा प्रभाव पडणार नाही. मुस्लीम नागरिक लोकशाही व संविधानाने दिलेला हक्क निश्चितपणे प्राधान्याने बजावतील, यात शंका नाही.
-हाफीज हिसामुद्दीन अशरफी,
शहर-ए-खतीब्

भारतीय मुस्लीम परंपरेप्रमाणे पहाटे ‘रोजा’ करण्यापूर्व सहेरीचा विधी पूर्ण करेल आणि त्यानंतर दिवसाची सुरुवात नमाजपठणाने करेल. सकाळी ७ वाजेच्या सुमारास मतदान केंद्रांवर जाऊन लोकशाहीने दिलला अधिकार अंमलात आणेल.
- सय्यद मीर मुख्तार,
सुन्नी मुस्लिम सीरत समिती, नाशिक

Web Title: Voting ends Ramadan in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.