बाजार समिती निवडणुकीसाठी मतदान

By admin | Published: January 31, 2016 10:10 PM2016-01-31T22:10:25+5:302016-01-31T22:11:34+5:30

मनमाड : शिवनेरी विरुद्ध नम्रता पॅनलमध्ये तीव्र चुरस

Voting for the market committee elections | बाजार समिती निवडणुकीसाठी मतदान

बाजार समिती निवडणुकीसाठी मतदान

Next

मनमाड : मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अटीतटीच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान घेण्यात आले. किरकोळ शाब्दिक चकमकी वगळता मतदान शांततेत झाले. शिवनेरी विरुद्ध नम्रता पॅनलमध्ये झालेल्या या तुल्यबळ लढतीकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे. या निवडणूकीत ९८.२४ टक्के मतदान झाले आहे.
बाजार समितीच्या सोसायटी गटातून ११, ग्रामपंचायत गटातून चार, व्यापारी गटातून दोन, हमाल मापारी गटातून एक अशा एकूण अठरा जागांसाठी ४६ उमेदवार रिंगणात असून यात शिवसेना पुरस्कृत सुहास कांदे, माजी आमदार संजय पवार, गंगाधर बिडगर यांच्या शिवनेरी शेतकरी विकास पॅनलची सरळ लढत जिल्हा बॅँकेचे माजी संचालक चंद्रकांत गोगड यांच्या नम्रता पॅनलशी होत आहे.
दोन्ही गटांकडून प्रचारात आघाडी घेतली असून विजयाचा दावा करण्यात येत असला तरी शेतकरी राजा कोणत्या गटाकडे सत्ता सोपवेल, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
या निवडणुकीसाठी मनमाड, कोंढार, हिसवळ या तीन मतदान केंद्रावर रविवारी मतदान घेण्यात आले. कोंढार येथील जि.प. शाळेत कोंढार, नवसारी, भार्डी, दऱ्हेल, बोयेगाव, नांदूर, धनेर, हिसवळ प्राथमिक शाळेत हिसवळ, मांडवड, मोहेगाव, लक्ष्मीनगर, बेजगाव धोटाणे खुर्द तर मनमाड येथील छत्रे विद्यालयाच्या मतदान केंंद्रावर मनमाड, पानेवाडी, नागापुर, अनकवाडे, वंजारवाडी, सटाणे, कऱ्ही, एकवई, पांझणदेव, धोटाणे, अस्तगाव, खादगाव, माळेगाव येथील मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. (वार्ताहर)मनमाड कृउबा निवडणुकीसाठी येथील छत्रे विद्यालयाच्या मतदान केंद्राबाहेर कार्यकर्त्यांची जमा झालेली गर्दी.

Web Title: Voting for the market committee elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.