मतदानासाठी यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 11:45 PM2019-10-20T23:45:47+5:302019-10-21T00:34:06+5:30

जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि.२१) होणाºया मतदानाची संपूर्ण तयारी करण्यात आली असून, मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.

Voting mechanism ready | मतदानासाठी यंत्रणा सज्ज

विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी (दि.२१) मतदान होणार असून, जिल्हा निवडणूक शाखेकडून रविवारी मतदानासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांकडे मतदान साहित्य सुपूर्द करण्यात आले. लोकशाहीच्या या उत्सवाच्या तयारीसाठी पंचवटीतील मीनाताई ठाकरे स्टेडियममध्ये मतदान कर्मचाऱ्यांची जणू यात्राच भरली होती.

Next
ठळक मुद्देजोरदार तयारी : जिल्ह्यात सर्वत्र कामकाजाला वेग

नाशिक : जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि.२१) होणाºया मतदानाची संपूर्ण तयारी करण्यात आली असून, मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.
जिल्ह्यातून अधिकाधिक मतदान व्हावे यासाठी जिल्हा निवडणूक शाखेकडून व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात आली आहे. लोकशाहीच्या या महोत्सवात समाजातील सर्व घटकांतील अधिकाधिक मतदारांनी सहभागी व्हावे यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून उपाययोजना केल्या जात आहेत. आता निवडणुकीसाठी होणारे मतदान अवघ्या काही तासांवर येऊन ठेपल्याने यासाठी प्रशासकीय यंत्रणेने जोरदार तयारी केली आहे.
निवडणुकीसाठी मतदारसंघातील ४,४४६ व अंदाजे १३९ साहाय्यकारी मतदान केंद्रांसाठी २७,१९४ इतके अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. या कर्मचाºयांना वेळोवेळी मतदानप्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. प्रत्यक्ष मतदान केंद्रातील कामकाज, ईव्हीएम मशीन, मतमोजणी याबाबतची तांत्रिक माहिती कर्मचाºयांना देण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघांतील ४,५७९ मतदान केंद्रांवर घेण्यात येणाºया निवडणुकीसाठी विविध आस्थापनेवरील सुमारे साडेचार हजार कर्मचाºयांची नियुक्ती मतदान केंद्रांवर करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त लागणाºया कामांसाठी किमान पाच हजार चतुर्थश्रेणी कर्मचाºयांचीदेखील नियुक्ती निवडणूक शाखेने केलेली आहे.
गेल्या दोन महिन्यांत राबविण्यात आलेल्या मतदार जनजागृती मोहिमेत ५६ हजार मयत आणि दुबार मतदारांची नावे वगळण्यात आली, तर दुसरीकडे दीड लाख नवीन मतदारांची नावे नोंदविण्यात आल्यामुळे मतदारयादीतील जवळपास ५० हजार नावांची घट झाल्याचे समोर आले. संवेदनशील मतदान केंद्रांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात किमान ६० मतदान केंद्रे संवेदनशील होती. यामध्ये सर्वाधिक ३३ केंद्रे मध्य विधानसभा मतदारसंघात होती.
मतदारांसाठी सोयी-सुविधा
किमान अत्यावश्यक सुविधांमध्ये पिण्याचे पाणी, विद्युतपुरवठा, प्रकाश योजना, ब्रेल भाषेतील मतपत्रिका, शौचालय, दिव्यांग मित्र आदी सर्व किमान सुविधा पुरविण्यात येतील.
४दिव्यांग मतदारांना मतदार नोंदणी करणे, मतदान केंद्राचा शोध घेणे, व्हीलचेअरची मागणी नोंदविणे यासाठी पीडब्ल्यूडी अ‍ॅपची सुविधा देण्यात आली आहे.
४सर्व मतदान केंद्रांवर दिव्यांग तसेच वयोवृद्ध मतदारांकरिता व्हीलचेअर व रॅम्पची व्यवस्था.
४दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिक मतदारांकरिता वेगळ्या रांगेची व्यवस्था.
४अंध मतदारांच्या सोयीकरिता मतदान केंद्रांवरील सूचनाफलक आणि मतदार यादी, ब्रेल लिपीमध्ये तयार करण्यात आली आहे.
४मतदानयंत्रावर ब्रेल लिपी मुद्रित केली असल्याने त्यांना कोणाच्याही मदतीखेरीज मतदान करता येणे शक्य.
४लहान मुलासह मतदानास येणाºया महिला मतदारांच्या मुलांकरिता प्रसंगी पाळणाघराची व्यवस्था करण्यात आली आहे.
४ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांना सोयीचे व्हावे, म्हणून पहिल्या अथवा दुसºया मजल्यावरील सुमारे १९६ मतदान केंद्रे तळमजल्यावर स्थलांतरित.
४पहिल्या वा दुसºया मजल्यावर असलेल्या मतदान केंद्रासाठी लिफ्टची व्यवस्था.
१३३ साहाय्यकारी मतदान केंद्रे
१५०० मतदारसंख्येपेक्षा जास्त मतदार संख्या असेल तर त्या मतदान केेंद्राला संलग्न अन्य एक साहाय्यकारी मतदान केंद्र सुरू करावे लागणार असल्याने जिल्ह्यात एकूण मतदारकेंद्रांची संख्या १३३ने वाढली आहे. जिल्ह्यात १५०० पेक्षा जास्त मतदार असेलेली १३३ केंद्रे आहेत. त्यामुळे साहाय्यकारी मतदान केंद्रे निर्माण झाली आहेत. एका मतदान केंद्रावर किती मतदार असावेत या निकषानुसार मतदान केंद्रांची संख्या निश्चित केली जाते. त्यानुसार जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या ४,४४६ वरून ४,५७९ इतकी झाली आहे.
२ वाढलेल्या या केंद्रांमध्ये ६४ केंद्रे ही तात्पुरत्या स्वरूपात असणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार १५०० मतदारांपेक्षा जास्त मतदार असल्यास तेथे साहाय्यकारी मतदान केंद्र उभारले जाते. विधानसभा निवडणुकीसाठी कायमस्वरूपी ४ हजार ४४६ इतके मतदान केंद्रे असून, १५०० पेक्षा मतदार असलेली १३३ केंद्रे आहेत. जिल्ह्यात ४५ लाख २४ हजार ६६३ इतकी मतदार संख्या आहे.
३ निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील दुसºया मजल्यावरील मतदान केंद्रे स्थलांतरित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील २०६ पैकी १९६ मतदान केंद्र हे तळमजल्यावर स्थलांतरित करण्यात आली आहेत, तर सहा केंद्रांवर लिफ्टची व्यवस्था असल्यामुळे ती ‘जैसे थे’ आहे. १९६ पैकी ६४ केंद्रे ही तात्पुरत्या स्वरूपातील आहेत.

Web Title: Voting mechanism ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.