रात्री ८ वाजेपर्यंत मतदानप्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 01:13 AM2019-10-22T01:13:45+5:302019-10-22T01:14:28+5:30

Maharashtra Assembly Election 2019 पूर्र्व विधानसभा मतदारसंघातील गावठाण भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेठरोड, फुलेनगर तसेच श्री काळाराम मंदिर, गणेशवाडी परिसरात असलेल्या चार मतदान केंद्रावर रात्री ८ वाजेपर्यंत मतदानप्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 Voting process till 7pm | रात्री ८ वाजेपर्यंत मतदानप्रक्रिया

रात्री ८ वाजेपर्यंत मतदानप्रक्रिया

Next

पंचवटी : पूर्र्व विधानसभा मतदारसंघातील गावठाण भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेठरोड, फुलेनगर तसेच श्री काळाराम मंदिर, गणेशवाडी परिसरात असलेल्या चार मतदान केंद्रावर रात्री ८ वाजेपर्यंत मतदानप्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सायंकाळी ५ वाजेनंतर मतदान करण्यासाठी मतदारांचा ओघ वाढल्याने ही परिस्थिती निर्माण झाली होती. आर.पी. विद्यालयात सायंकाळी ६.३० वाजेनंतर मतदान सुरू होते.
झोपडपट्टी व गावठाण परिसरात पंचवार्षिक निवडणुका असो की लोकसभा किंवा विधानसभा या प्रत्येक निवडणुकीच्या वेळी मतदार दुपारनंतर घराबाहेर पडत असल्याने मतदान केंद्रावर गर्दी होत असते. पंचवटीतील पूर्व विधानसभा मतदारसंघ १२३ मधील फुलेनगर येथील मनपा शाळा, श्री काळाराम मंदिर येथील पुणे विद्यार्थी वसतिगृह, पेठरोडवरील उन्नती शाळा व गणेशवाडी येथील आयुर्वेद रुग्णालय या ठिकाणी असलेल्या मतदान केंद्रात रात्री ८ वाजेपर्यंत मतदारप्रक्रिया सुरू होती. सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान वेळ असल्याने ६ वाजेपूर्वी मतदानासाठी आलेल्या मतदारांना मतदानासाठी मतदान केंद्राकडे सोडले जात होते.

Web Title:  Voting process till 7pm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.