मतदान जनजागृती, भिंती बोलूं लागल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 05:49 PM2019-04-23T17:49:05+5:302019-04-23T17:49:17+5:30

कळवण- भारत सरकार खेल व युवा मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्र नाशिक संलिग्नत जय योगेश्वर बहुउद्देशीय संस्था कळवण यांच्यावतीने कळवणच्या परिसरामध्ये मतदान जनजागृती च्या संदेश देणार्यासाठी विविध भिंतीवर रेखाटलेल्या चित्रांमधून संदेश दिला आहे.

Voting public awareness, talking to the walls | मतदान जनजागृती, भिंती बोलूं लागल्या

मतदान जनजागृती, भिंती बोलूं लागल्या

googlenewsNext

कळवण- भारत सरकार खेल व युवा मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्र नाशिक संलिग्नत जय योगेश्वर बहुउद्देशीय संस्था कळवण यांच्यावतीने कळवणच्या परिसरामध्ये मतदान जनजागृती च्या संदेश देणार्यासाठी विविध भिंतीवर रेखाटलेल्या चित्रांमधून संदेश दिला आहे. यामध्ये उपजिल्हा सरकारी रु ग्णालय, मेन रोड कळवण, शिवाजीनगर, रामनगर, मानूर, जुना ओतूर रोड अश्या विविध ठिकाणी मतदान जनजागृती च्या संदेश देणार्या विविध भिंती वर चित्रांमूळे मतदान करण्याबाबत चे विविध संदेश देण्यात आले आहे.भिंती बोलक्या झल्याचा अनुभव कळवण मधील नागरिकांना येत आहे.
मतदारजागृतीचे एक वेगळ्या पद्धतीने आयोजन करण्यात आले. मतदान जनजागृती हा उपक्र म यशस्वी करून देशाच्या लोकशाही व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी मतदारजागृतीच्या प्रयत्नात सहभागी व्हायला हवे.असे मत जय योगेश्वर बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनित मालपुरे यांनी मांडले.
या उपक्र माबद्दल नेहरू युवा केंद्र संघटन महाराष्ट्र गोवा राज्य संचालक दिनेश रॉय , उपसंचालक संध्या देवतळे संजय ममदापुरे , बाबासाहेब गोडसे, नाना पाटील व तसेच दिलीप आहेर यांनी जय योगेश्वर बहुउद्देशीय संस्थेचे , अध्यक्ष विनीत मालपुरे उपाध्यक्ष सागर काठे सचिव तुषार पाटील यांचा हा उपक्रम स्त्युत्य असल्याचे सांगितले. 

 

Web Title: Voting public awareness, talking to the walls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.