इगतपुरी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत विक्रमी गर्दीत मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 02:45 PM2019-06-23T14:45:22+5:302019-06-23T14:46:05+5:30

घोटी : आगामी विधानसभा निवडणुकीचे प्रभावी चित्र उभ्या करणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या सार्वित्रक निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. सर्व ग्रामपंचायतींत जनतेमधून पहिल्यांदाच थेट सरपंच निवडला जात असल्याने सरपंचपदासाठी चुरशीचे मतदान होत आहे. सरपंचपदाच्या ३४ जागांसाठी १२१, सदस्यपदाच्या २३६ जागांसाठी५३३ असे ६५४ उमेदवारांचे भवितव्य मतदानातून निश्चित होणार आहे.

 Voting in a record crowd in Gram Panchayat elections in Igatpuri taluka | इगतपुरी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत विक्रमी गर्दीत मतदान

गोंदे दुमाला येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी महिलांसह पुरु ष मतदारांची  गर्दी.

Next
ठळक मुद्दे३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानासाठी अनेक गावांत मतदानासाठी रांगा लागल्या आहेत. संवेदनशील गावांमध्ये चोख पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे.



घोटी : आगामी विधानसभा निवडणुकीचे प्रभावी चित्र उभ्या करणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या सार्वित्रक निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. सर्व ग्रामपंचायतींत जनतेमधून पहिल्यांदाच थेट सरपंच निवडला जात असल्याने सरपंचपदासाठी चुरशीचे मतदान होत आहे. सरपंचपदाच्या ३४ जागांसाठी १२१, सदस्यपदाच्या २३६ जागांसाठी५३३ असे ६५४ उमेदवारांचे भवितव्य मतदानातून निश्चित होणार आहे.

नाशिक जिल्ह्याची मोठी बाजारपेठ असणारी घोटी बुद्रुक, औद्योगिक वसाहत असणारी गोंदे दुमाला, वाडीवº्हे, पौराणिक वारसा असलेली टाकेद बुद्रुक, माणिकखांब, सांजेगाव, बेलगाव तºहाळे आदी महत्वपूर्ण गावांत मोठ्या चुरशीची निवडणूक होत आहे. या गावांमध्ये पहिल्यांदा जनतेतून सरपंच निवडला जाणार असल्याने मतदानासाठी मोठ्या रांगा लागल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीमुळे या ३४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे सर्व राजकीय क्षेत्राचे लक्ष लागलेले आहे. वाडीवº्हेचे पोलीस निरीक्षक सुहास देशमुख, इगतपुरीचे पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, घोटीचे पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. इगतपुरीच्या तहसीलदार वंदना खरमाळे-मांडगे यांच्या नेतृत्वाखाली निवासी नायब तहसीलदार दिनेश पाडेकर, राजेश कांबळे, इगतपुरीचे मंडळ अधिकारी सुरेंद्र पालवे, नितीन बाहीकर, बाबा देशमुख, नानासाहेब बनसोडे, सूरज भालेराव, राजकुमार भालेराव, ग्रामविकास अधिकारी सुरेश भोजने आदींसह तहसील कर्मचारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
 

Web Title:  Voting in a record crowd in Gram Panchayat elections in Igatpuri taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.