समर्थ बॅँकेसाठी आज मतदान
By Admin | Published: February 20, 2016 11:04 PM2016-02-20T23:04:14+5:302016-02-20T23:04:57+5:30
दुरंगी लढत : सारडा कन्या विद्यालयात होणार मतदान
नाशिक : श्री समर्थ सहकारी बॅँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (२१) मतदान होत असून, सत्ताधारी समर्थ पॅनल व विरोधी श्री समर्थ पॅनलच्या उमेदवारांमध्ये दुरंगी लढत होणार आहे. सोमवारी (दि.२२) द्वारका येथील समर्थ मंगल कार्यालयात मतमोजणी होणार आहे.
श्री समर्थ सहकारी बॅँकेच्या १५ संचालक पदाच्या निवडणुकीत यापूर्वीच भटक्या विमुक्त जमाती संगर्वातून अॅड. जालिंदर ताडगे व इतर मागास प्रवर्ग गटातून डॉ. रविकुमार निकम यांची बिनविरोध निवड झाली आहे. आता सर्व साधारण संवर्गातील दहा, महिला राखीव संवर्गातील दोन व अनुसूचित जाती संवर्गातील एक अशा एकूण १३ जागांसाठी १८ उमेदवार रिगंणात आहेत. त्यात सर्वसाधारण संवर्गातील दहा जागांसाठी समर्थ पॅनलकडून अॅड. लक्ष्मण उगावकर, नरेंद्र कुलकर्णी, श्रीपाद कुलकर्णी, बाळकृष्ण कुलकर्णी, प्रमोद गर्गे, मनोज गोडसे, डॉ. प्रशांत पुरंदरे, अरुण भांड, मकरंद सुखात्मे, तर श्री समर्थ पॅनलकडून शंकरराव बर्वे, मंदार तगारे व मंगेश मालपाठक निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महिला राखीवच्या दोन जागांसाठी समर्थ पॅनलकडून अलका मुकुंद कुलकर्णी व हेमा चिंतामण दशपुत्रे, तर श्री समर्थ पॅनलकडून सविता हेमंत कुलकर्णी या उमेदवार आहेत. तसेच अनुसूचित जाती संवर्गातून समर्थ पॅनलकडून प्रकाश रामदास ठाकूर, तर श्री समर्थ पॅनलकडून लक्ष्मिकांत अंडे यांच्या दुरंगी सामना होणार आहे. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून डी. एस. पराये हे काम पाहत आहेत. (प्रतिनिधी)