प्रभाग क्रमांक १३ मध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी तिरंगी लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:24 AM2018-03-24T00:24:02+5:302018-03-24T00:24:02+5:30
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ मध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी शुक्रवारी (दि. २३) तिघांनी माघार घेतल्याने आठ उमेदवार नशीब आजमावणार आहेत. मात्र, मनसे, शिवसेना आणि भाजपा या तिघांमध्येच खरी लढत पाहायला मिळणार आहे. दरम्यान, भाजपाच्या पदाधिकाºयांनी पक्षाच्याच उमेदवाराला माघार घेण्यासाठी दबाव टाकण्याचा केलेला प्रयत्न असफल ठरला आहे.
नाशिक : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ मध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी शुक्रवारी (दि. २३) तिघांनी माघार घेतल्याने आठ उमेदवार नशीब आजमावणार आहेत. मात्र, मनसे, शिवसेना आणि भाजपा या तिघांमध्येच खरी लढत पाहायला मिळणार आहे. दरम्यान, भाजपाच्या पदाधिकाºयांनी पक्षाच्याच उमेदवाराला माघार घेण्यासाठी दबाव टाकण्याचा केलेला प्रयत्न असफल ठरला आहे. प्रभाग क्रमांक १३ मधील पोटनिवडणुकीसाठी ११ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. शुक्रवारी (दि. २३) अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती. त्यात भाजपाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या माजी नगरसेवक माधुरी मिलिंद जाधव, भाजपाच्याच तिकिटावर गेल्यावेळी लढलेल्या कीर्ती शुक्ल आणि मनसेच्या डमी उमेदवार रश्मी सचिन भोसले यांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे निवडणूक रिंगणात मनसेच्या अॅड. वैशाली मनोज भोसले, शिवसेनेच्या स्नेहल संजय चव्हाण, भाजपाच्या विजया हरीश लोणारी यांच्यासह अपक्ष उमेदवार ज्योती नागराज पाटील, समीना कयूम पठाण, अवंतिका किशोर घोडके, माजी नगरसेवक व राष्टÑवादीच्या बंडखोर उमेदवार रंजना ज्ञानेश्वर पवार आणि समीमा मकसूद खान यांच्यात लढत होणार आहे. दिवंगत नगरसेवक सुरेखा भोसले यांच्या कुटुंबीयांकडून सदर निवडणूक बिनविरोध होण्यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न केले गेले; परंतु त्यात यश आले नाही. मनसेच्या उमेदवाराला कॉँग्रेस आणि राष्टÑवादीने पाठिंबा दर्शविला आहे. मनसेच्या उमेदवारासमोर शिवसेनेच्या स्नेहल चव्हाण यांनी तगडे आव्हान उभे केले आहे, तर भाजपानेही उमेदवार दिल्याने खºया अर्थाने तिरंगी सामना रंगणार आहे. शनिवारी (दि. २४) उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाणार आहे. पोटनिवडणुकीसाठी एकूण ४७ हजार २२८ मतदार असून, त्यात २४ हजार १४० पुरुष, तर २३ हजार ८८ स्त्री मतदार आहेत. ४ एप्रिल पर्यंत प्रचारासाठी अवधी असल्याने उमेदवारांनी घरोघरी जाऊन संपर्क साधण्यास सुरुवातही केली आहे. दि. ६ एप्रिल रोजी मतदान होऊन ७ एप्रिलला गंगापूररोडवरील शिवसत्य मैदानात मतमोजणी प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.
भाजपा उमेदवारावर दबाव
मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी भाजपातील काही पदाधिकाºयांचा एक गट प्रयत्नरत होता. त्यानुसार, सकाळी भाजपाच्या वसंत स्मृती कार्यालयात शहराध्यक्षांसमवेत पदाधिकाºयांची बैठक झाली. यावेळी, पक्षाच्या उमेदवार विजया लोणारी यांनी माघार घ्यावी, यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला. परंतु, यापूर्वी दोन वेळा माघार घेण्यास भाग पाडल्याने लोणारी यांनी माघारीस स्पष्ट नकार दिला. त्यामुळे पदाधिकाºयांचा नाइलाज झाला. अखेर, डमी उमेदवार कीर्ती शुक्ल आणि माधुरी जाधव यांचेच अर्ज मागे घेण्यात आले.