आगामी निवडणुकीत व्हीव्हीपॅट यंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 12:46 AM2018-02-08T00:46:51+5:302018-02-08T00:49:26+5:30
नाशिक : प्रत्येक निवडणुकीत मतदान यंत्राच्या फेरफारबाबत घेतल्या जाणाºया शंकेवर तोडगा म्हणून भारत निवडणूक आयोगाने यापुढच्या विधानसभा, लोकसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदान यंत्राला व्हीव्हीपॅट यंत्र बसविण्याचा निर्णय घेतला असून, राज्य सरकारकडे सध्या पडून असलेली सर्व यंत्रे जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नाशिक जिल्ह्यासाठी एप्रिलमध्ये व्हीव्हीपॅट बसविलेले इव्हीएम यंत्र देण्यात येणार आहे.

सन २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीपासूनच राजकीय पक्ष तसेच मतदारांकडून इव्हीएम यंत्राबाबत शंका घेतली जाऊ लागली असून, त्यानंतर राज्याराज्यात झालेल्या विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठराविक एका पक्षालाच मिळणाºया बहुमताला मतदान यंत्रच कारणीभूत असल्याचा उघड आरोप केला गेला. त्या संदर्भात न्यायालयाचे दरवाजेही ठोठावण्यात आले तर मतदान यंत्रात फेरबदल करता येतात याचे सादरीकरणही काही राज्यांच्या विधिमंडळात करण्यात आले. त्यामुळे निष्पक्ष व पारदर्शी कामकाज करणाºया भारत निवडणूक आयोगाच्या सचोटीबाबत शंका घेतली जात असल्याचे पाहून आयोगाने गेल्या सहा महिन्यांपासून आपल्यावरील बालंट दूर करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. गुजरात व हिमाचल राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काही प्रमाणात व्हीव्हीपॅट यंत्र बसविलेल्या इव्हीएमचा वापर केला होता, त्यामुळे गुजरातच्या निवडणुकीत विशिष्ट पक्षाची मक्तेदारी काही प्रमाणात कमी झाल्याचा दावाही राजकीय पक्षांनी केला होता. या सर्व बाबींचा विचार करता आगामी निवडणुकीत व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर करण्यात येणार आहे. त्याची सुरुवात सन २०१९ मध्ये होणाºया लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत होण्याची त्याचबरोबर चालू वर्षी पाच राज्यांत होणाºया निवडणुकीतही केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आयोगाने प्रत्येक जिल्ह्णातील निवडणूक अधिकाºयांशी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधून तसे संकेत दिले आहेत. सन २००६ पासून निवडणूक आयोगाने जिल्ह्णांना लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी दिलेली मतदान यंत्रे जमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याबदल्यात नवीन मतदान यंत्रे एप्रिल महिन्यापासून टप्प्याटप्प्याने वाटप केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.नवीन यंत्रे देणारनाशिक जिल्ह्यात सुमारे ५२८५ इतकी जुनी मतदान यंत्रे असून, त्या मोबदल्यात जवळपास साडेसहा हजाराच्या आसपास नवीन यंत्रे दिली जाणार आहेत. जुनी यंत्रे हैदराबाद किंवा आंध्र प्रदेशमध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स कार्पोरेशनला पोहोचती करावी लागणार आहेत.