व्हीव्हीपॅट देणार आता मतदानाची खात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 05:33 PM2018-12-17T17:33:54+5:302018-12-17T17:34:16+5:30

पेठ : आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणूका जवळ आल्याने राजकिय पक्षांबरोबर निवडणूक आयोगानेही आपली प्रशासकिय तयारी सुरू केली असून ईव्हीएम मशीनबाबत मतदारांमध्ये असलेले गैरसमज दुर करण्यासाठी आता व्हीव्हीपॅट (VVPAT)  नावाचे नवीन मशीन विकॅसत करण्यात आले असून याद्वारे मतदाराला त्याच्या मताची खात्री पटणार आहे.

VVPAT will now ensure voting | व्हीव्हीपॅट देणार आता मतदानाची खात्री

पेठ येथे मतदार जनजागृती अभियानात सहभागी कर्मचारी व ग्रामस्थ.

googlenewsNext
ठळक मुद्देमतदार जनजागृती अभियान : नव्या मशिनबाबत मतदारांना उत्सुकता

पेठ : आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणूका जवळ आल्याने राजकिय पक्षांबरोबर निवडणूक आयोगानेही आपली प्रशासकिय तयारी सुरू केली असून ईव्हीएम मशीनबाबत मतदारांमध्ये असलेले गैरसमज दुर करण्यासाठी आता व्हीव्हीपॅट (VVPAT)  नावाचे नवीन मशीन विकॅसत करण्यात आले असून याद्वारे मतदाराला त्याच्या मताची खात्री पटणार आहे.
यापुर्वी झालेल्या मतदान प्रक्रि येत ईव्हीएम मशीन बाबत अनेक वेळा शंका घेतल्या गेल्या. यावरून राजॅकय पक्षांमध्ये आरोप- प्रत्यारोपही झाले. आपण केलेले मतदान नेमके त्याच उमेदवाराच्या खात्यात जमा झाले किंवा नाही याची मतदाराला खात्री नव्हती. त्यामुळे मतदार संशयानेच मतदान करून बाहेर पडत असे. जिंकून आलेल्या उमेदवारावर मतदान यंत्रात सेटींग केल्याचे आरोपही होतांना दिसून आले.
यावर निवडणूक आयोगाने संशोधन करून आता व्हीव्हीपॅट नावाचे अजून एक मशीन विकसित केले असून हे मशीन बॅलेट युनिट सोबत मतदान कक्षात ठेवण्यात येणार आहे. मतदाराने मतदान केल्यानंतर सात सेकंदाच्या आत सदरच्या मशीनवर मतदाराला आपल्या मताची खात्री करता येणार आहे. त्यामुळे आता मतदाराला कोणत्याही प्रकारचा संशय राहणार नाही, याची दक्षता निवडणूक आयोगाकडून घेण्यात येत आहे.

मतदार जनजागृती अभियान
निवडणूक आयोगाने केलेल्या या नवीन बदलाची मतदारांना माहीती व्हावी यासाठी पेठ तालुक्यात दि. १७ ते २७ डिसेंबर २०१८ दरम्यान मतदार जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे. चित्ररथाव्दारे मतदारांना या नव्या यंत्राची माहीती व प्रात्यक्षिक दाखवण्यात येत असून शासकिय अधिकारी व कर्मचारी यांचे दोन पथक तयार करण्यात आले आहेत. सदरचा चित्ररथ गावागावात जाऊन मतदारांना कर्मचाऱ्यांमार्फत प्रात्यक्षिक दाखवणार असल्याने आगामी निवडणूकांमध्ये या नव्या तंत्रज्ञानाचे मतदारांना आकर्षण राहणार आहे.

प्रतिक्रि या -
निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचनेनुसार प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी तालुक्याला मशीन प्राप्त झाले आहे. त्यासाठी दोन पथकांच्या माध्यमातून आगामी दहा दिवसात पेठ तालुक्यात विविध गावांना भेटी देऊन मतदारांना माहीती व प्रात्यक्षिक दाखवले जाणार आहे. यासाठी राजकिय पक्षांचे पदाधिकारी व त्यांचे प्रतिनिधी यांनी जनजागृतीसाठी सहकार्य करण्याची अपेक्षा आहे. या संदर्भात राजकिय पक्षांच्या प्रतिनिधींची स्वतंत्र बैठक घेऊन मार्गदर्शन करण्यात आले आहे.
- हरिष भामरे, तहसीलदार पेठ.
 

Web Title: VVPAT will now ensure voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.