कर्तृत्वाने समाजात स्थान मिळवा वायुनंदन : व्ही. एन. नाईक संस्थेत पदवीप्रदान सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 12:56 AM2018-03-04T00:56:01+5:302018-03-04T00:56:01+5:30
नाशिक : उदयोन्मुख विद्यार्थी घडत आहेत. हा विद्यार्थी व्यावसायिक विचाराने मार्गक्रमण न करता सामाजिक संवेदनशीलतची जाणीव ठेवणारा असल्याने आपल्या कर्तृत्वाने समाजात स्थान मिळवेल याची खात्री आहे,
नाशिक : महाराष्टÑाला प्रगल्भ असा सामाजिक आणि शैक्षणिक वारसा लाभला असल्याने, अनेक उदयोन्मुख विद्यार्थी घडत आहेत. हा विद्यार्थी व्यावसायिक विचाराने मार्गक्रमण न करता सामाजिक संवेदनशीलतची जाणीव ठेवणारा असल्याने आपल्या कर्तृत्वाने समाजात स्थान मिळवेल याची खात्री आहे, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांनी केले.
क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लोकनेते गोपीनाथराव मुंढे अभियांत्रिकी महाविद्यालय आणि दिंडोरी येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाचा तिसरा पदवीग्रहण सोहळा व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११२ व संयुक्त पदवीग्रहण सोहळा नुकताच संस्थेच्या प्रांगणात पार पडला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. वायुनंदन बोलत होते. उपेक्षित वर्गाला शैक्षणिक समूहात जोडून त्यांचा विकास करण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. मात्र सामाजात कर्तृत्वाने स्थान मिळविण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची आहे. कोणतीही पदवी किंवा अभ्यास स्वत:ची जागा निर्माण करीत असते, त्यामुळे इतरांशी तुलना न करता विद्यार्थ्यांनी सामाजिक कर्तव्य आणि सहकार्याची भावना ठेवून मार्गक्रमण करावे. जेणेकरून आपल्यासह इतरांचा विकास होण्यास मदत होईल, असेही डॉ. वायुनंदन म्हणाले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष प्रभाकर धात्रक, सरचिटणीस हेमंत धात्रक, सहचिटणीस अॅड. तानाजी जायभावे, विश्वस्त डॉ. धर्माजी बोडके, संचालक महेश आव्हाड, शिक्षणाधिकारी आर. सी. सोनवणे, संदीप फाउंडेशनचे डॉ. दिवेदी, प्राचार्य डॉ. शातांराम बडगुजर, डॉ. संजय सानप, तुलसीदास सुतार, उपप्राचार्य दिलीप कुटे, परीक्षाधिकारी डॉ. राजेंद्र सांगळे, प्रा. आर. एम. शेख, विद्यापीठ प्रतिनिधी किरण सोनवणे, राजेंद्र संसारे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. शरद काकड यांनी केले, प्रास्ताविक डॉ. शांताराम बडगुजर, परिचय श्रीमती मुंढे, तर आभार तुलसीदास सुतार यांनी मानले.