व्यंकटरमना देवा, लक्ष्मीरमना देवा..., फुल-फुल फुलपाखरा..., मन घुंगरु-घुंगरु...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:55 AM2018-04-23T00:55:40+5:302018-04-23T00:55:40+5:30

Vyankataramana deva, Lakshmirma devo ..., full-blossom butterfly ..., mind bulgur-bongru ... | व्यंकटरमना देवा, लक्ष्मीरमना देवा..., फुल-फुल फुलपाखरा..., मन घुंगरु-घुंगरु...

व्यंकटरमना देवा, लक्ष्मीरमना देवा..., फुल-फुल फुलपाखरा..., मन घुंगरु-घुंगरु...

Next

नाशिक : व्यंकटरमना देवा, लक्ष्मीरमना देवा..., फुल-फुल फुलपाखरा..., मन घुंगरु-घुंगरु..., अशा एकापेक्षा एक सरस काव्यांच्या शब्दांना संगीताचे सूर लाभल्याने शब्द-सुरांचा अवीट संगम व्यंकटेश बालाजी मंदिरात उपस्थित भाविक श्रोत्यांनी अनुभवला.निमित्त होते, कापडपेठेतील व्यंकटेश बालाजी संस्थानाच्या वेणुनाद संयुक्त विद्यमाने मंदिरात रविवारी (दि.२२) आयोजित ‘शब्द सूर संवाद’ या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या दुसऱ्या पुष्पाचे. शहरातील प्रसिद्ध मराठी कवींच्या काव्यांना संगीतबद्ध करत त्यांचे दर चार महिन्यांनी ‘शब्द सूर संवाद’ कार्यक्रमात गीतांच्या स्वरूपात सादरीकरणाचा उपक्रम बासरीवादक संगीतकार मोहन उपासनी यांनी हाती घेतला आहे. या कार्यक्रमाच्या दुसºया पुष्प गुंफताना कवी किशोर पाठक यांच्या काव्यांना संगीतबद्ध करून त्या गीतांचे बहारदार सादरीकरण करण्यात आले.  यावेळी व्यंकटरमना देवा..., हे गीत गायक अशीष रानडे यांनी आपल्या दमदार आवाजात सादर क रून वातावरण भक्तिमय केले. यानंतर सुमारे आठ ते दहा काव्यरूपी गीतांचे सादरीकरण करत उपस्थितांची दिलखुलास दाद मिळविली. गायक ज्ञानेश्वर कासार, रसिका नातू, उपासनी यांनी आपल्या जादूई कंठाने उत्तरोत्तर मैफल खुलविली. त्यांना सतीश पेंडसे (तबला), अनिल धुमाळ (सिंथेसायझर), अभिजित शर्मा (आॅक्टोपॅड), शुभम जाधव (ºहीदम् मशीन) यांनी साथसंगत केली. मैफलीचे निवेदन किशोर पाठक यांनी केले. सूत्रसंचालन वैशाली बालाजीवाले यांनी केले.
...हा तर बडतर्फीचा खलिता
‘कुणी म्हणती जगणे आहे सुंदर कविता, तर कुणी म्हणती हा तर बडतर्फीचा खलिता’ ‘अरे जगणे म्हणजे धनादेश कोरा...शाई संपते स्वाक्षरी करता-करता’ या कविता सादर करत पाठक यांनी जगण्याचा अर्थ सांगणाºया कविता प्रारंभी सादर करत उपस्थित प्रेक्षकांना काव्याचे गीतामध्ये रूपांतर होताना शब्दांना सूर गवसतात आणि त्या कवितेचे गाणे होते, असे त्यांनी यावेळी सांगितले.
नारायणा...नारायणाचा जयघोष
व्यंकटरमना देवा..., या गीताच्या सादरीकरणाप्रसंगी अखेरीस गायकाने धरलेला ताल आणि या भक्तिपूर्ण रचनेच्या शेवटी ‘नारायणा..., नारायणा...,’ चा झालेल्या जयघोषाने मंदिर दुमदुमले. यावेळी उपस्थित श्रोत्यांनीही मंत्रमुग्ध होत टाळ्यांनी दाद देत नारायणा...नारायणाचा जयघोष केला. ही रचना कवी पाठक यांनी अवघ्या एका रात्रीत खास ‘शब्द-सूर संवाद’ या कार्यक्रमासाठी रचली होती.

Web Title: Vyankataramana deva, Lakshmirma devo ..., full-blossom butterfly ..., mind bulgur-bongru ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक