सौभाग्याच्या धन्यासाठी सुवासिनींचे वडाला साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:11 AM2021-06-25T04:11:58+5:302021-06-25T04:11:58+5:30
सायखेडा : जन्मोजन्मी हाच पती मिळू दे, निरामय स्वास्थ्य व दीर्घायुष्य लाभू दे, संसाराचा गाडा आनंदाने व सुखाने ...
सायखेडा : जन्मोजन्मी हाच पती मिळू दे, निरामय स्वास्थ्य व दीर्घायुष्य लाभू दे, संसाराचा गाडा आनंदाने व सुखाने चालू दे, अशी करुणा भाकत जिल्ह्यात ठिकठिकाणी वटपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.
पिंपळगाव निपाणी ग्रामपंचायतीतर्फे गावातील महिलांना वडाच्या झाडांचे वाटप करण्यात आले. वडाच्या झाडांचे संगोपन करून ते मोठे केले, तर खरी वटसावित्रीची पौर्णिमा साजरी होईल. निसर्ग संवर्धनाचा विचार गावातील महिलांमध्ये रुजावा म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी सरपंच शिवाजी खाडे, उपसरपंच रामभाऊ बोडके, ज्ञानेश्वर खाडे, ग्रामसेवक आर.पी. सोनार, सीमा कर्डक, वर्षा वाघ, अंगणवाडीसेविका भारती कडवे यांसह महिला उपस्थित होत्या.
----------------------------
पिंपळगाव निपाणी येथे वडाच्या झाडांचे वाटप करताना सरपंच शिवाजी खाडे यांसह उपस्थित नागरिक. (२४ सायखेडा)
-----------------------
मानोरी परिसर
मानोरी : येथे वटसावित्री पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कोरोनाचे सावट काहीसे कमी झाल्यानंतर गावातील सुवासिनींनी एकत्र येत येथील ५० ते ६० वर्षे जुन्या असलेल्या वटवृक्षांच्या झाडांची पूजा केली. तसेच जगभरात घोंगावत असलेल्या कोरोनातून सर्वांना मुक्ती देण्याची प्रार्थना सुवासिनींकडून करण्यात आली.
--------------------
प्राथमिक शाळा, ब्राह्मणगाव
ब्राह्मणगाव : येथील प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक सुनील निकम, शिक्षक संजय भामरे यांनी वटवृक्षाची लागवड करून महिलांनी पूजन करत वटपौर्णिमा साजरी केली. प्राथमिक शाळेत या प्रसंगी सर्व शिक्षिका, दगा अहिरे उपस्थित होते.
------------------
वणीत घरातच केली पूजा
वणी : शहरात आज वटपौर्णिमा घरातच साजरी करण्यात आली. प्रातिनिधिक स्वरूपात वडाच्या झाडाची फांदी सुशोभित चौरंगावर विधिवत पूजन करून ठेवण्यात आली. फुलांचे सुशोभीकरण करून त्या फांदीचे पूजन करण्यात आले. कोविड नियमांचे पालन करत घरातच वटपौर्णिमा साजरी करून पतीसाठी दीर्घायुष्यासाठी पूजाविधी करण्यात आला.
-----------------------
===Photopath===
240621\24nsk_23_24062021_13.jpg
===Caption===
२४ सायखेडा