वडालागाव मनपा घरकूल योजनेला पावसामुळे गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 11:40 PM2020-08-25T23:40:14+5:302020-08-26T01:11:39+5:30

इंदिरानगर : वडाळागाव येथे महापालिकेने उभारलेल्या घरकुल योजनेतील घरकुलामध्ये पावसाच्या पाण्याने गळती लागली असून, निष्कृष्ट दर्जाचे बांधकामामुळे लाभार्थ्यांना या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने स्वत:चे घरकुल झाल्याचे स्वप्न भंग करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कारवाई ची मागणी त्रस्त नागरिकांकडून होत आहे

Wadalagaon Municipal Corporation Gharkool Yojana leaks due to rains | वडालागाव मनपा घरकूल योजनेला पावसामुळे गळती

वडालागाव मनपा घरकूल योजनेला पावसामुळे गळती

Next
ठळक मुद्देभिंतींना तडे : संसार उपयोगी वस्तूंचे नुकसान

संजय शहाणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
इंदिरानगर : वडाळागाव येथे महापालिकेने उभारलेल्या घरकुल योजनेतील घरकुलामध्ये पावसाच्या पाण्याने गळती लागली असून, निष्कृष्ट दर्जाचे बांधकामामुळे लाभार्थ्यांना या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने स्वत:चे घरकुल झाल्याचे स्वप्न भंग करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कारवाई ची मागणी त्रस्त नागरिकांकडून होत आहे
वडाळा गावातील मांगिरबाबा चौक ते पांढरी चौक या शंभर फुटी रस्त्याच्या दुर्तफा असलेल्या अनधिकृत झोपड्या महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पोलिसांचा फौजफाटा घेऊन जमीनदोस्त केला होता. तेथील रहिवासी आणि गंजमाळ परिसरातील रहिवाशी आधार कार्ड रेशन कार्ड कागदपत्रांची तपासणी करून लाभार्थी निवडण्यात आले त्यानंतर शंभर फुटी रस्त्यालगत महापालिकेने बांधलेल्या घरकुल योजनेत दोन वर्षांपूर्वी घरे वाटप करण्यात आले होते. या घरकुल योजनेत एकूण नऊ इमारती असून त्यामध्ये सुमारे 720 सदनिका आहेत चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेवटच्या मजल्यावरील छत गळती होऊन संसार उपयोगी वस्तूंचे नुकसान होत आहे. सर्वत्र भिंतींना ओलावा आल्यामुळे प्लॅस्टर सुद्धा पडत आहेत. इमारत क्रमांक दोन तीन व चार मध्ये अनेक घरकुलाचे बाथरूम व शौचालयाचे पाणी गळती होऊन सदनिकांमध्ये टपकत आहे. त्यामुळे भिंतींना तडे पडले आहेत. त्यामुळे इमारती कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. घरकुल घेण्यासाठी नागरिकांनी आपली सारी कमाई लावली. निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे घरकुलाचे स्वप्न भंग झाल्याचे नागरिकांनी सांगितले. सुमारे350 रहिवाशांनी आपली घरे भाडेतत्त्वावर दिली आहेत यापैकी काहीजणांना घरकुल योजनेत घरकुलाची गरज नसतानाही घरे घेतली आहे तर काही जण स्वत:च्या पक्क्या घरात वास्तव करीत आहेत त्यामुळे घरकुलाचची देखभाल होत नाही. निकृष्ट दर्जाचे बांधकाम करणाºया संबंधित ठेकेदाराकडून घरकुलाची दुरुस्ती करून घ्यावी अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.

Web Title: Wadalagaon Municipal Corporation Gharkool Yojana leaks due to rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.