वडाळ्याच्या ‘कन्टेन्मेंट झोन’ची होणार पुनर्रचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 09:03 PM2020-06-05T21:03:03+5:302020-06-05T21:07:12+5:30

गावक-यांनी मात्र कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी मास्क, सॅनिटायझर, परस्परांमधील ‘डिस्टन्स’ आदी सर्व नियमांचे पालन करण्याची अटदेखील घातल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले

Wadala's 'containment zone' will be restructured | वडाळ्याच्या ‘कन्टेन्मेंट झोन’ची होणार पुनर्रचना

वडाळ्याच्या ‘कन्टेन्मेंट झोन’ची होणार पुनर्रचना

Next
ठळक मुद्देगावठाण परिसर वगळण्याबाबत आयुक्त सकारात्मकवडाळा गावाला तीन दिवसांपुर्वी ‘सील’ केले.मनपा व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे: विजय खरात, उपायुक्त

नाशिक : वडाळागाव परिसर तीन दिवसांपुर्वी ‘कन्टेंन्मेंट झोन’ महापालिकेने केला; मात्र कुठल्याही पुरक सोयीसुविधा मुख्य गावठाण भागात उपलब्ध करून दिल्या नसल्याचा आरोप करत येथील रहिवाशांनी या कन्टेन्मेंट झोनमधून मुख्य वडाळा गावठाणचा भाग वगळण्याची मागणी लावून धरली. यानुसार नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी प्रतिबंधित क्षेत्राच्या पुनर्रचना करण्याबाबत सकारात्मका दर्शविल्याची माहिती महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिली
वडाळागावाबाहेरून जाणाऱ्या शंभरफूटी रस्त्याच्या पलिकडे असलेल्या नागरी वसाहतीत कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या संख्येने आढळून आले; मात्र मनपा प्रशासनाने संपुर्ण वडाळा गावाला तीन दिवसांपुर्वी ‘सील’ केले. कन्टेंन्मेंट झोन जाहीर केल्यानंतर मनपा प्रशासनाने जीवनावश्यक वस्तूंसह आदि सोयीसुविधांबाबत उपाययोजना करण्यावर लक्ष दिले नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. पोलिसांकडून गावात येणाºया मुख्य रस्त्यासह सर्वच उपरस्ते बंद केले गेले. यामुळे गावकºयांना कुठल्याही कामासाठी बाहेर पडणे मुश्कील झाले. गावठाण भागात केवळ झीनतनगरमध्ये एक कोरोनाग्रस्त रूग्ण आढळला असून या भागातील तीन रूग्ण कोरोनामुक्तदेखील झाले आहे. यामुळे गावकºयांनी निवेदनाद्वारे प्रतिबंधित क्षेत्रातून वडाळ्याचा मुख्य गावठाण परिसर तातडीने वगळण्याची मागणी निवेदनाद्वारे लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय अधिका-यांकडे केली होती. नागरिकांची मागणी लक्षात घेता कुलकर्णी यांनी मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याशी याबाबत चर्चा केली. त्यांनी प्रतिबंधित क्षेत्रातून गावठाण वगळण्याबाबत सकारात्मकता दर्शविली असून गावक-यांनी मात्र कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी मास्क, सॅनिटायझर, परस्परांमधील ‘डिस्टन्स’ आदी सर्व नियमांचे पालन करण्याची अटदेखील घातल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले

हा भाग राहणार 'कन्टेंन्मेंट झोन'
शंभर फुटी रस्त्यालगत असलेल्या मुमताजनगर, महेबुबनगर, सादिकनगर, गुलशननगर या दाट लोकवस्तीच्या भागात आतापर्यंत सर्वाधिक १५ ते २० कोरोना रूग्ण आढळून आले आहे. त्यामुळे हा संपुर्ण परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून मनपा प्रशासनाकडून ‘जैसे-थे’ ठेवला जाणार आहे. पुढील आठवडाभर या भागातील नागरिकांनी कुठल्याही अफवा न पसरविता आपल्या आरोग्याची काळजी करत मनपा व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपायुक्त विजय खरात यांनी केले आहे. कायदासुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणा-यांवर थेट कारवाईचे आदेशही त्यांनी दिले आहे.

Web Title: Wadala's 'containment zone' will be restructured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.