वडाळागाव चौफुली ते साईनाथनगर  जॉगिंग ट्रॅकलगत वाहते गटार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 01:10 AM2018-10-09T01:10:07+5:302018-10-09T01:10:32+5:30

वडाळागाव चौफुली ते साईनाथनगरपर्यंत साधारणत: १ कि.मी.चा जॉगिंग ट्रॅक उजव्या कालव्याच्या जागेत तयार करण्यात आला आहे. या ट्रॅकवर मातीचा रस्ता तयार करून चार ते पाच वर्षांचा कालावधी उलटला तर गाजरगवताची कापणी मागील दोन वर्षांपासून होऊ शकलेली नाही. ट्रॅकशेजारून भूमिगत गटारीचे चेंबर तुडुंब भरून वाहत असल्याने दुर्गंधी पसरली आहे.

 Wadalgaon Chaufuli to Sainathnagar Jogging Trackland flows drain | वडाळागाव चौफुली ते साईनाथनगर  जॉगिंग ट्रॅकलगत वाहते गटार

वडाळागाव चौफुली ते साईनाथनगर  जॉगिंग ट्रॅकलगत वाहते गटार

Next

नाशिक : वडाळागाव चौफुली ते साईनाथनगरपर्यंत साधारणत: १ कि.मी.चा जॉगिंग ट्रॅक उजव्या कालव्याच्या जागेत तयार करण्यात आला आहे. या ट्रॅकवर मातीचा रस्ता तयार करून चार ते पाच वर्षांचा कालावधी उलटला तर गाजरगवताची कापणी मागील दोन वर्षांपासून होऊ शकलेली नाही. ट्रॅकशेजारून भूमिगत गटारीचे चेंबर तुडुंब भरून वाहत असल्याने दुर्गंधी पसरली आहे.
जॉगिंग ट्रॅक संकल्पना खरी तर निरामय सुदृढ आरोग्यासाठी विकसित करण्यात आली आहे. शहरातील जॉगिंग ट्रॅक या संकल्पनेनुसार विकसित करण्यात आलेदेखील आहे; मात्र वडाळागावचा जॉगिंग ट्रॅक याबाबत अपवाद ठरतो. या जॉगिंग ट्रॅकवरून फेरफटका मारणे म्हणजे निरोगी शरीर रोगी करून घेण्यासारखेच आहे. कारण जॉगिंग ट्रॅकला आलेला बकालपणा, वाढलेले गाजरगवत, ठिकठिकाणी पडलेला कचरा, वाहणारी गटारगंगा, खड्डे, बाकांचा अभाव, पथदीपांची असुविधा, व्यायाम साहित्याची कमतरता, संरक्षक कुंपणाची तटबंदी नाही, अशा एक ना अनेक समस्यांनी या जॉगिंग ट्रॅकला ग्रासले आहे. केवळ एक ते दीड किलोमीटरचा हा ट्रॅक विकसित करण्याबाबत महापालिका प्रशासनासह लोकप्रतिनिधीदेखील तितकेच उदासिन आहेत. या जॉगिंग ट्रॅकचा वापर भाजीबाजार, वाहनतळासाठीदेखील केला जाऊ लागल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.  वडाळागावातील तरुण, तरुणी, महिला, ज्येष्ठ नागरिकांकडून वडाळा चौफुली ते साईनाथनगरपर्यंतच्या ट्रॅकला अधिक प्राधान्य दिले जाते; मात्र या ट्रॅकची दुर्दशा बघून नागरिकांना नाइलाजास्तव पाठ फिरवावी लागत आहे. कालव्याच्या जागेत वृक्षराजी चांगली बहरली असून गरज आहे ती जॉगिंगट्रॅकच्या विकासाची. चार वर्षांपूर्वी मुरूम टाकून वृक्षराजीच्या मध्य भागातून केवळ रस्ता तयार करून महापालिकेने जबाबदारी पूर्ण केल्याचा आव आणला आणि हात झटकले.

Web Title:  Wadalgaon Chaufuli to Sainathnagar Jogging Trackland flows drain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.