शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मनसेचा कृती आराखड्याचा ‘उतारा’

By admin | Published: September 26, 2015 11:20 PM2015-09-26T23:20:34+5:302015-09-26T23:21:37+5:30

बैठक : राज ठाकरे यांचे संकेत

'Wade' of MNS action plan on farmers' issues | शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मनसेचा कृती आराखड्याचा ‘उतारा’

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मनसेचा कृती आराखड्याचा ‘उतारा’

Next

नाशिक : राज्यातील दुष्काळ आणि टंचाईच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना भेडसावणारे प्रश्न आणि समस्या यासंदर्भात एकत्रित कृती आराखडा तयार करण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला आहे. या कृती आराखड्यानुसार सरकारने त्वरित कार्यवाही न केल्यास मनसेच्या वतीने राज्यभर आंदोलन उभारण्यात येणार आहे.
नाशिक येथील मनसेच्या राजगड या कार्यालयात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांची व ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या व प्रश्न नेमके काय आहेत, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव दिला पाहिजे, पश्चिम वाहिनी नद्यांना पूर्व वाहिनी नद्यांना जोडण्यात यावे, स्वामिनाथन आयोगानुसार शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चावर आधारित ५० टक्केनफा देण्यात यावा, शेतकऱ्यांना सद्यस्थितीत बाजार भावानुसार कर्ज मिळत
नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीचे बाजार भावाच्या मूल्यांकनानुसार ३० ते ४० टक्केकर्ज मिळावे, ते तूर्तास अत्यल्प प्रमाणात मिळते, दुष्काळ निवारण्यासाठी सरकारने एका समितीचे गठण करावे, यासह विविध मागण्यांचा उहापोह या बैठकीत झाल्याचे समजते. शेतकऱ्यांचे नेमके प्रश्न काय आहेत? त्यांची उत्तरे शोधू व त्यानंतरच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जन आंदोलन उभारू, अशी ग्वाही राज ठाकरे यांनी बैठकीत दिल्याचे समजते. यावेळी बैठकीत ग्रामीण जिल्हाध्यक्ष जि. प. सदस्य संदीप पाटील, अ‍ॅड. रतनकुमार इचम, शांताराम जाधव, शेखर पवार यांनी प्रश्न मांडल्याचे कळते. बैठकीस अविनाश अभ्यंकर, महापौर अशोक मुर्तडक, शहराध्यक्ष नगरसेवक राहुल ढिकले, जिल्हाध्यक्ष सुदाम कोंबडे, शशिकांत जाधव, गटनेते अनिल मटाले, सलीम शेख, रमेश खांडबहाले, शरद शिंदे, मनोज ढिकले, दीपक पगार, हंसराज वडघुले, अतुल अहिरे, जगदीश अहिरे, डॉ. राजेंद्र शिरोडे, संदीप रौंदळ, राजेंद्र माळी, धोंडीराम बोरसे, मनोज सोनवणे, राकेश भामरे, कुंदन पाटील, अरुण दुगजे, जगन्नाथ गायकवाड, बबन जहागीरदार आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: 'Wade' of MNS action plan on farmers' issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.