वडगावी मुलीचा विनयभंग, संशयितास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 00:39 IST2021-09-15T00:38:30+5:302021-09-15T00:39:36+5:30
मालेगाव तालुक्यातील वडगाव येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयित वैभव राजेंद्र खैरनार (२४) रा.वडगाव यास वडनेर खाकुर्डी पोलिसांनी काल सोमवारी अटक केली.

वडगावी मुलीचा विनयभंग, संशयितास अटक
मालेगाव : तालुक्यातील वडगाव येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयित वैभव राजेंद्र खैरनार (२४) रा.वडगाव यास वडनेर खाकुर्डी पोलिसांनी काल सोमवारी अटक केली. रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. पीडित मुलीच्या आईने पोलिसात फिर्याद दिली. गेल्या महिनाभरापासून आरोपी अल्पवयीन मुलीला त्रास देत होता. रविवारी अचानक वडगावला अनाधिकाराने घरात प्रवेश करून, त्याने लज्जास्पद वर्तन केले, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक शिंदे करीत आहेत.